lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > मोदकांसाठी नारळ खोवण्याची १ भन्नाट सोपी पद्धत; बाप्पाचा नैवेद्य होईल झटपट...

मोदकांसाठी नारळ खोवण्याची १ भन्नाट सोपी पद्धत; बाप्पाचा नैवेद्य होईल झटपट...

Easy Method of Breaking Coconut Cooking Hacks Ganpati Festival : नारळाचा वापरणे सोपे होण्यासाठी खास हॅक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2023 03:20 PM2023-09-17T15:20:42+5:302023-09-17T15:24:06+5:30

Easy Method of Breaking Coconut Cooking Hacks Ganpati Festival : नारळाचा वापरणे सोपे होण्यासाठी खास हॅक...

Easy Method of Breaking Coconut Cooking Hacks Ganpati Festival : 1 super easy method of coconut shelling for modaks; Ganpati's offering will be done instantly... | मोदकांसाठी नारळ खोवण्याची १ भन्नाट सोपी पद्धत; बाप्पाचा नैवेद्य होईल झटपट...

मोदकांसाठी नारळ खोवण्याची १ भन्नाट सोपी पद्धत; बाप्पाचा नैवेद्य होईल झटपट...

गणपती अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपल्याने आता घरोघरी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी शेवटच्या टप्प्यात आली असेल. डेकोरेशन, लायटींग, फुलं-हार पत्री यांबरोबरच बाप्पाच्या नैवेद्याचीही महिला वर्गात जोरदार तयारी असते. उकडीचे मोदक दे पक्वान्न गणपती बसण्याच्या दिवशी आणि त्यानंतरही १० दिवस आवर्जून केले जातात. इतकेच नाही तर बाकी पदार्थ बनवण्यासाठीही आपल्याला नारळाचा चव लागतोच. असे हे नारळ फोडणे आणि त्यातून नारळाची वाटी बाहेर काढणे हे काही वेळा थोडे किचकट काम असते (Easy Method of Breaking Coconut Cooking Hacks Ganpati Festival). 

नारळाच्या शेंड्या काढणे म्हणजेच तो सोलणे, मग तो व्यवस्थित फोडणे आणि मग त्यातील खोबरं करवंटीपासून वेगळं करणे हे सगळं करण्यात बराच वेळ जातो. तसंच हे काम शक्तीचं असल्याने त्यासाठी एनर्जीही लागते. पण ताज्या नारळाला दुसरा पर्याय नसल्याने आपण हे सगळे कितीही कष्ट पडले तरी करतो. गणेशोत्सवात आपल्यामागे आधीच कामांची खूप जास्त कामं असतात. त्यात खोबरं वाटीपासून वेगळं करायचं आणि खोवण्याचं काम सोपं झालं तर आपला काही प्रमाणात लोड कमी होऊ शकतो. यासाठीच आज आपण एक अतिशय सोपी ट्रिक पाहणार आहोत. त्यामुळे स्वयंपाकाचे काम थोडे झटपट होण्यास नक्कीच मदत होईल. पाहूयात खोबरं काढण्याची सोपी पद्धत...

(Image : Google)
(Image : Google)

१. एका पातेल्यात पाणी घेऊन ते गॅसवर उकळायला ठेवायचे. 

२. त्यावर एक चाळणी ठेवून त्या चाळणीत नारळाच्या करवंट्या ठेवायच्या. 

३. या चाळणीवर झाकण ठेवून १० ते १५ मिनीटे याला चांगली वाफ लागू द्यायची. 

४. त्यानंतर झाकण काढून करवंट्या थोडाशा गार होऊ द्यायच्या. 

५. मग सुरी किंवा चमच्याच्या साह्याने करवंटीपासून खोबरं वाटी काढण्याचा प्रयत्न करायचा. 

 

६. या खोबऱ्याचा मागचा चॉकलेटी भाग सालकाढीने काढला आणि बारीक काप करुन ते मिक्सर केले की पांढरा शुभ्र खोबऱ्याचा चव मिळतो. मोदकांसाठी हा चव वापरणे नक्कीच सोपे होते. यामुळे खोबरं खोवण्याचा त्रास वाचतो.

७. तसेच हे खोबरं आपल्याला वाटण किंवा अन्य पदार्थांसाठी वापरायचे असेल तर ते किसले नाहीतर चॉकलेटी थरासह मिक्सर केले तरीही चालतात.

Web Title: Easy Method of Breaking Coconut Cooking Hacks Ganpati Festival : 1 super easy method of coconut shelling for modaks; Ganpati's offering will be done instantly...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.