Join us  

नाश्त्याला करा दुधी भोपळ्याचे खमंग पॅनकेक, मुलांना डब्यात देण्यासाठीही पौष्टिक- चवदार पदार्थ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2023 9:23 AM

How to Make Lauki Ke Pan Cake: नाश्त्यासाठी पौष्टिक, चवदार आणि वेगळं काही करायचं असेल तर दुधी भोपळ्याचे (dudhi bhopala) पॅनकेक करून पाहा.. घ्या कुणाल कपूर यांची ही खास रेसिपी

ठळक मुद्देदुधी भोपळ्याचे पॅनकेक करून द्या.. सगळेजण आवडीने खातील. ही रेसिपी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केली आहे.

कधी कधी नाश्त्याला काय करायचं हा प्रश्नच पडतो. कारण घरात सगळ्यांना तेच ते नेहमीचे पदार्थ खायचे नसतात. काही तरी वेगळं असावं, चवदार असावं अशी घरातल्या सगळ्यांची आणि विशेषत: लहान मुलांची मागणी असते तर त्यांच्यासाठी काहीतरी पौष्टिक करावं असं आपल्याला वाटत असतं (Healthy recipe for tiffin). म्हणूनच या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे ज्या पदार्थात आहेत, असा पदार्थ म्हणजे दुधी भोपळ्याचे पॅन केक (How to make lauki ke pan cake). दुधी भोपळा अनेक जणांना आवडत नाही. त्यामुळे त्याची भाजी अनेकांना नको असते (Pan cake recipe for breakfast). अशा वेळी दुधी भोपळ्याचे पॅनकेक करून द्या (healthy recipe of lauki).. सगळेजण आवडीने खातील. ही रेसिपी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी शेअर केली आहे.

 

दुधी भोपळ्याचे पॅनकेक करण्याची रेसिपी

दुधी भोपळ्याचे पॅनकेक करण्यासाठी १ मध्यम आकाराचा दुधी भोपळा, २ लहान आकाराचे कांदे, अर्धा टेबलस्पून आलं, २ ते ३ हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून तेल, फोडणीसाठी जिरे आणि मोहरी, चिमूटभर हिंग, २ उकडलेले बटाटे, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, २ टेबलस्पून दही, १ वाटी किंवा २०० ग्रॅम १ तास भिजवलेले तांदूळ, अर्धा टिस्पून मिरे आणि चवीनुसार मीठ असं साहित्य लागणार आहे.

दिवाळीचा उरलेला फराळ वापरून करा ३ खमंग- खरपूस पदार्थ! लगेचच फस्त होईल सगळा फराळ

सगळ्यात आधी दुधी भोपळ्याच्या साली काढा आणि तो किसून घ्या. त्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं मीठ टाका. काही वेळाने त्याला पाणी सुटेल. 

 

आता उकडलेले बटाटे, भिजवलेले तांदूळ, मिरे, मिरच्या आणि आलं हे मिश्रण मिक्सरमधून काढून घ्या आणि त्याची बारीक पेस्ट करा. हे मिश्रण मिक्सरमधून फिरवताना त्यात पाणी टाकावे लागेल. त्यासाठी तुम्ही किसलेल्या दुधी भोपळ्यातून सुटलेले पाणी वापरू शकता.

केसांच्या वाढीसाठी बघा कसं वापरायचं बदामाचं तेल

यानंतर मिक्सरमधलं मिश्रण आणि किसलेला दुधी भोपळा, कांदा हे सगळं एका मोठ्या भांड्यात एकत्र करा. त्यात दही आणि चवीनुसार मीठ टाका. त्यावर जिरे, मोहरी, हिंग टाकलेली फोडणी घाला. आवडीनुसार आणि पॅनकेक हलके व्हावे यासाठी तुम्ही त्यात थोडासा बेकिंग सोडा, बेकिंग पावडर किंवा इनो टाकू शकता. नाही टाकले तरी चालेल.

यानंतर तव्याला तेल लावून घ्या आणि आपण तयार केलेल्या मिश्रण पळीने तव्यावर टाका. हे मिश्रण डोसा करतो त्याप्रमाणे चमच्याने पसरवू नये. ते जेवढे स्वत:हून पसरेल, तेवढेच पसरू द्यावे. तेल सोडून मंद आचेवर खालून- वरून भाजून घेतले की गरमागरम पॅन केक झाले तयार.. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीकुणाल कपूर