Join us

वाटल्या चणाडाळीचे करा सुंदर लाडू, विकतच्या बुंदीच्या-मोतीचुराच्या लाडवासारखे लाडू घरीच करण्याची झटपट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 17:13 IST

Easy and unique method of making laddus, no need to grind gram flour, cooking tips : बेसन न वापरताही करता येतात असे लाडू. एकदा नक्की करुन पाहा.

सणावाराला लाडू तर नक्कीच करायला हवे. मात्र त्याच त्याच पद्धतीचे आणि चवीचे लाडू खाऊन कंटाळा येऊ शकतो. मोतीचूराचा बेसनाचा लाडू तर नेहमी केला जातोच. (Easy and unique method of making laddus, no need to grind gram flour, cooking tips)एकदा या पद्धतीने चणाडाळीचा लाडू करुन पाहा. बेसनाचे पीठ न वापरता भिजवलेली चणाडाळ घ्यायची. एकदा नक्की करुन पाहा करायला अगदीच सोपे आहे. वेळही कमी लागतो. बेसन भाजायचे कष्टच नाहीत. अगदी झटपट रेसिपी आहे. 

साहित्यचणाडाळ, पाणी, साखर, तूप, सुकामेवा, दूध

कृती१. चणाडाळ किमान चार ते पाच तास भिजवायची. रात्रभर भिजत घातली तरी चालेल. भिजल्यावर त्यातील पाणी काढून टाका आणि  डाळ छान वाटून घ्या. अगदी पातळ वाटू नका. जरा घट्टच वाटा. भजीच्या पिठासारखे करायचे. त्याहून जरा घट्ट चालेल मात्र पातळ नको. 

२. एका पॅनमध्ये किंवा कढईत वाटीभर तूप घ्यायचे. तूप जरा गरम करायचे. त्यात वाटलेल्या डाळीचे मुटके सोडायचे. चमच्याने पिठाचे गोळे तुपात सोडायचे आणि खमंग परतायचे. नंतर ते काढून घ्यायचे आणि जरा गार करायचे. गार झाल्यावर ते मधोमध तोडून मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. रवाळ वाटून घ्यायचे. छान सुके पीठ वाटले जाते. तुपाचा अगदी हलकासा ओलावा त्याला राहतो. 

३. त्याच तुपात सुकामेवाही परतून घ्यायचा. काजू, बदामाचे तुकडे करायचे. ते तुकडे छान खमंग परतायचे. एका परातीत वाटलेले पीठ घ्यायचे. त्यात परतलेला सुकामेवा घालायचा. ते छान मिक्स करायचे. 

४. एकीकडे साखरेचा पाक तयार करुन घ्यायचा. त्यासाठी समप्रमाणात साखर आणि पाणी घ्यायचे. त्यात अगदी दोन चमचे दूध घालायचे आणि एकतारी छान पाक तयार करायचा. उकळता पाक तयार पिठात ओतायचा. मस्त एकजीव करायचे. पाक तुमच्या आवडीनुसार घ्या. जेवढे गोड आवडे त्यानुसार प्रमाण ठरवा. पाक आणि पीठ छान मिक्स झाल्यावर हाताला तूप लावायचे आणि छान लाडू वळून घ्यायचे. मस्त रवाळ आणि चविष्ट होतात. 

टॅग्स :गणेशोत्सव 2025अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.