Join us
Daily Top 2Weekly Top 5

दत्तजयंती स्पेशल : प्रसादाला करा दलियाची खास खीर, पारंपरिक नैवेद्याची एक सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2022 11:21 IST

Dutta Jayanti Special Recipe Dalia Kheer : पारायणाचे ७ दिवस उपवास करुन शेवटच्या दिवशी म्हणजेच दत्तजयंतीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो.

ठळक मुद्देहिवाळ्याच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देणारी दलियाची खीर दत्तजयंतीला आवर्जून केली जाते. दूध आपल्या आवडीनुसार घालावे, ही खीर घट्ट किंवा पातळ कशीही छान लागते.

राज्यभरात आणि राज्याच्या बाहेरही काही ठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला दत्तजयंसाजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भगवान दतात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण केले जाते. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. पारायणाचे ७ दिवस उपवास करुन शेवटच्या दिवशी म्हणजेच दत्तजयंतीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. ठिकठिकाणी असणाऱ्या दत्त मंदिरांमध्ये आजच्या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो. यावेळी साधारणपणे दलियाच्या म्हणजेच गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दत्ताला दाखवण्यात येतो. घरीही आपण ही खीर सहज करु शकतो. थंडीच्या दिवसांत ही खीर खाणे आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय चांगले असते. पाहूया या खिरीची सोपी रेसिपी (Dutta Jayanti Special Recipe Dalia Kheer).    

(Image : Google)

साहित्य - 

१. गव्हाचा दलिया - २ वाट्या

२. दूध - अर्धा लिटर 

३. गूळ किंवा साखर - १ ते १.५ वाटी

४. तूप - अर्धी वाटी

५. सुकामेवा - पाव वाटी 

६. वेलची पूड - अर्धा चमचा

७. ओल्या खोबऱ्याचा किस - १ वाटी 

कृती -

१. गव्हाचा दलिया स्वच्छ धुवून पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावा.

२. कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये हा दलिया घालून चांगला परतून घ्यावा.

३. यामध्ये गूळ किंवा साखर आणि खोबऱ्याचा किस घालून हे मिश्रण एकजीव करावे. 

४. थोडी वाफ आल्यानंतर त्यामध्ये दूध घालून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.

५. मग यामध्ये सुकामेव्याचे काप आणि वेलची पावडर घालून सगळे पुन्हा एकदा चांगले हलवून एकजीव करावे. 

६. दूध आपल्या आवडीनुसार घालावे. ही खीर घट्ट किंवा पातळ कशीही छान लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.