दत्तजयंतीचा उत्सव गुरुवारी घरोघरी साजरा होत आहे. अनेक दत्त मंदिरांमध्ये तर या दिवसाची विशेष तयारीही सुरू झालेली असणार. या दिवशी दत्तगुरुंची पूजा करून त्यांना सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो. दत्त मंदिरांमध्ये इतर प्रसाद असला तरी थोडासा सुंठवडा अवश्य दिलाच जातो. कारण दत्तगुरुंच्या पुजेमध्ये सुंठवड्याचा मोठा मान आहे. हा सुंठवडा घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येतो. त्याचीची ही एक खास रेसिपी पाहा.. (Dutta Jayanti Naivedya Sunthvada Recipe)
सुंठवडा रेसिपी
१ चमचा सुंठ पावडर
काजू, बदाम, बेदाणे असा सुकामेवा मिळून पाऊण वाटी
२ चमचे खारीक पूड
अर्धा चमचा खसखस
हिवाळ्यात पायात सॉक्स घालून पाय उबदार ठेवायलाच हवेत, कारण... वाचा ६ जबरदस्त फायदे
१ टीस्पून वेलची पूड आणि जायफळाची पूड
२ चमचे खडीसाखर
२ चमचे पिठीसाखर
अर्धी वाटी किसलेलं खोबरं
कृती
बदाम, काजू कढईमध्ये अगदी मंद आचेवर खमंग भाजून घ्या. सुकामेवा भाजताना गॅस मोठा करू नका. भाजून घेतलेला सुकामेवा थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्याची थोडी जाडसर पावडर करा.
व्हेज बिर्याणीही लागेल चमचमीत-पाहा पनीर दम बिर्याणीची हॉटेलपेक्षा भारी रेसिपी! बिर्याणीची अस्सल चव
सुकामेव्याची पावडर एक मोठ्या भांड्यात काढून घेतल्यानंतर त्यात पिठीसाखर, सुंठ पावडर, खारीक पावडर, वेलची पूड, किसलेलं खोबरं आणि जायफळाची पूड घाला.
सगळ्यात शेवटी त्यात सुंठ पावडर घाला, बेदाणे घाला आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून एकत्र करा. त्यात तुम्ही हवं तर केशराच्या काड्याही घालू शकता. सुंठवड्याचा नैवेद्य झाला तयार.
