दसऱ्याच्या (Dasara 2025) दिवशी अनेक घरांमध्ये जिलेबी आणि फाफडा खाल्ला जातो. फाफडा हा गुजरातचा लोकप्रिय नाश्त्याचा प्रकार आहे (How To Make Fafda). महाराष्ट्रातील लोक आवडीने नाश्त्याला फाफडा खातात. काहीजणांना मिरचीसोबत फाफडा खायला खूप आवडते. फाफडा चवीला चटपटीत, खमंग लागतो. विकतसारखा फाफडा घरी करणं एकदम सोपं आहे. फाफड्याची सोपी रेसिपी पाहूया. ( Dusshera Special How To Make Gujrati Fafda At Home)
फाफडा करण्यसाठी लागणारं साहित्य
बेसन : १ कप
बेकिंग सोडा : पाव चमचा
ओवा : अर्धा चमचा
हळद : चिमूटभर
मीठ : चवीनुसार
तेल : आवश्यकतेनुसार
पाणी: गरजेनुसार
फाफडा करण्याची सोपी कृती
एका मोठ्या भांड्यात बेसन, ओवा हातावर चोळून मग घाला. नंतर हळद आणि मीठ घ्या. आता त्यात खाण्याचा सोडा आणि चार चमचे गरम तेल (मोहन) घाला. हे मिश्रण हाताने चांगले चोळून एकत्र करा. पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागले पाहिजे. त्यानंतर, थोडं थोडं पाणी वापरून घट्ट आणि मऊ कणिक मळून घ्या.
पुऱ्या भरपूर तेलकट होतात-तळल्यानंतर वातड होतात? 7 टिप्स, मस्त टम्म फुगतील-मऊ होतील
कणिक खूप सैल करू नका. कणिक मळल्यानंतर, ती ओल्या कपड्याने झाकून १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा. यामुळे कणिक चांगली मुरते आणि फाफडा कुरकुरीत होतो.
आता कणकेचे छोटे गोळे तयार करा. ही फाफडे लाटण्याची पद्धत खास आहे. गोळा लाटण्याऐवजी, तो पोळपाटावर ठेवा. हाताने थोडासा दाबून त्याला लांबट आकार द्या. आता तळहाताने किंवा बोटांनी सपाट दाब देऊन, त्या गोळ्याला पुढे सरळ रेषेत लांब दाबा. यामुळे फाफड्याला पातळ, लांबट, आणि एकसमान आकार मिळतो. अशाप्रकारे तयार झालेले फाफड्याचे पट्टे चाकूने हळूवारपणे पोळपाटावरून काढून घ्या. ते अतिशय पातळ असावेत.
दसऱ्याला करा चमचमीत व्हेज पुलाव; पुलावची सोपी रेसिपी, मऊ-मोकळा शिजेल भात
एका कढईत तेल चांगले कडक गरम करा. तेल पुरेसे गरम झाल्यावर, गॅसची आच मध्यम करा. तयार केलेले फाफड्याचे पट्टे गरम तेलात सोडा. फाफडा खूप पातळ असल्याने तो लगेच तळला जातो. तो हलका सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यावर, लगेच तेलातून काढून घ्या आणि टिश्यू पेपरवर ठेवा.