Join us

Dussehra Special Masalebhat Recipe : दसऱ्याला करा अप्रतिम चवीचा -मऊ मोकळा मसाले भात; ही घ्या उत्कृष्ट पारंपरिक रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 14:27 IST

Dussehra Special Masalebhat Recipe : तांदूळ परतल्यानंतर त्यात गरम पाणी, मीठ घालून वाफ काढून घ्या आणि पाणी आटले की त्यात धणे, जीरं, तूप घालून छान व्यवस्थित एकत्र करा. त्यानंतर यात काजू आणि कोथिंबीर घाला. 

दसऱ्याला (Dussehra 2022 Special) काय मेन्यू करायचा याच विचारात अनेकजणी असतील. श्रीखंड, पुरी किंवा पुरणपोळीसह डाळ भात खावासा वाटत नाही किंवा काहीतरी नवीन करावंस वाटतं. मसालेभात करायला अगदी सोप्पा आहे. यासाठी तुम्हाला जास्तवेळही लागणार नाही. तुम्हाला आवडत असलेल्या सर्वच भाज्या तुम्ही मसाले भातासाठी वापरू शकता. मसाले भाताची सोपी, पटकन होणारी रेसेपी या लेखात पाहूया. (How to make masale bhat)

साहित्य

2 कप बासमती तांदूळ, 1 टोमॅटो, 1 बटाटा, 1 आलं, 1/4 कप उभी चिरलेली तोंडली आवडीनुसार, 1 चार मिरच्या, दीड कप मटार, २ कप फ्लॉवर, 2 कप गाजर, १ चमचा गोडा मसाला, १ लाल तिखट, १ हळद, तमालपत्र, जीरेपूड, धणे, १ चमचा तूप, ओलं खोबरं, कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ, तेल किंवा तूप (आवडीनुसार)

कृती

१) सगळ्यात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्या.  भाज्या कापून पाण्यात ठेवा. 

२) कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र,जीरं, राई, हिंग, टोमॅटो घालून छान परतून घ्या. नंतर त्यात सर्व भाज्या घालून छान परतून घ्या. 

३) नंतर त्यात  लाल तिखट,हळद,गोडा मसाला, तांदूळ घालून छान परतून घ्या.

४) तांदूळ परतल्यानंतर त्यात गरम पाणी, मीठ घालून वाफ काढून घ्या आणि पाणी आटले की त्यात धणे, जीरं, तूप घालून छान व्यवस्थित एकत्र करा. त्यानंतर यात काजू आणि कोथिंबीर घाला. 

५) आणखी काहीवेळ गॅसवर ठेवून या भाताच्या दोन वाफा काढल्यानंतर वरून ओलं  खोबरं घाला आणि पापड, जिलेबीसोबत सर्व्ह करा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स