Join us

धडाम! तुमच्याही स्वयंपाकघरात कुकरचा स्फोट होण्याचा धोका आहे, ३ गोष्टी आजच तपासा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2025 15:43 IST

due to these 3 mistakes pressure cooker explodes like a bomb : Pressure Cooker Explosion Risk : Dangerous Pressure Cooker Mistakes : What causes a pressure cooker to blast : The Top 3 Causes of Pressure Cooker Explosions and How to Avoid Them : कुकर आपण वापरतो पण तो नीट वापरणं शिकून घेतलं नाही तर जीवावर बेतू शकतं.

स्वयंपाक घरातील काही भांडी अशी असतात जी आपण नेहमीच वापरतो. प्रेशर कुकर प्रत्येक घरोघरी हमखास रोजच वापरला जातो. कुकरमुळे जेवण पटकन शिजतं आणि वेळेची (due to these 3 mistakes pressure cooker explodes like a bomb) बचतही होते. याचबरोबर, डाळीपासून भाज्यांपर्यंत बरेचसे (Pressure Cooker Explosion Risk) पदार्थ एकदा का कुकरमध्ये शिजत ठेवले की पटकन होतात. हा कुकर जितका फायदेशीर आहे तितकाच तो आपल्यासाठी धोकादायक देखील ठरु शकतो. कुकर वापरताना तितकीच काळजी देखील घ्यावी लागते(The Top 3 Causes of Pressure Cooker Explosions and How to Avoid Them).

अनेकदा निष्काळजीपणा किंवा काही चुकांमुळे कुकर फुटू शकतो. ही घटना खूप गंभीर असून यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. अनेकवेळा लहानसहान चुका, अयोग्य देखभाल किंवा योग्य ती काळजी न घेतल्यामुळे कुकर फुटण्याच्या गंभीर घटना घडतात, यामुळे फक्त अन्नपदार्थांची नासधूसच होत नाही तर अपघाताचाही धोका निर्माण होतो. कुकर का फुटतो, याची कारणं समजून घेतल्यास आपण असे अपघात टाळू शकतो. आपल्या किचनमध्ये रोज वापरला जाणारा कुकर जर अचानक फुटला, तर त्यामागचं कारण नक्की काय असू शकतं? अनेकांना याचा अंदाजही नसतो. काही लहान चुका अशा मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरतात. कुकर का फुटतो, नेमकी त्यामागे काय कारणं आहेत ते पाहूयात... 

कुकर फुटण्याची मुख्य ३ कारणं... 

१. व्हेंट पाईप ब्लॉक होणे :- कुकरच्या झाकणावर असणारी व्हेंट पाईप ही एक अत्यंत महत्त्वाची जागा असते जिथून कुकरमधील प्रेशर बाहेर पडतं आणि शिटी वाजते. मात्र, जर कुकर नीट स्वच्छ केला गेला नसेल किंवा शिजवत असताना त्यातला भात, डाळ, मसाले यांचे कण व्हेंटमध्ये अडकले, तर ही पाईप ब्लॉक होऊ शकते. अशावेळी कुकरमधील सगळा प्रेशर बाहेर निघू न शकल्याने त्याचा दबाव खूप वाढतो आणि कुकर फुटण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस कुकर वापरण्याआधी आणि नंतर व्हेंट पाईप साफ आहे की नाही, याची खात्री करणे अत्यावश्यक असते.

वापरलेली चहा पावडर फेकू नका! स्वयंपाकघरातील ६ कामं होतील सहजसोपी - वाटेल आधी का नाही केला उपाय...

२.  सेफ्टी व्हॉल्व फेल होणे :- सेफ्टी व्हॉल्व हे नावाप्रमाणेच एक सुरक्षा यंत्रणेसारखे काम करते. ही यंत्रणा कुकरमधील अपघात टाळण्यासाठी वापरली जाते. जेव्हा कुकरमध्ये प्रेशर खूपच वाढतं आणि त्याच वेळी व्हेंट पाईप जर ब्लॉक झालेला असेल, तेव्हा सेफ्टी व्हॉल्व आपोआप फाटून अतिरिक्त वाफ बाहेर सोडतो. त्यामुळे कुकर फुटण्याची वेळ येत नाही. पण जर हा सेफ्टी व्हॉल्व खराब झाला असेल, झिजलेला असेल किंवा वेळेवर बदललेला नसेल, तर तो काम करत नाही आणि परिणामी कुकर फाटण्याचा धोका निर्माण होतो. म्हणूनच, दर वर्षी कुकरचा सेफ्टी व्हॉल्व तपासणे व आवश्यक असल्यास बदलणे खूप गरजेचे आहे. 

Shravan Food : राजगिरा आणि शेंगदाण्याची बर्फी करा घरीच, उपवास स्पेशल पौष्टिक खाऊ - महिनाभर टिकेल...

३. कुकरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त अन्न भरल्याने :- प्रेशर कुकरमध्ये जर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त अन्नपदार्थ भरले गेले, तर वाफ बाहेर पडण्यासाठी आवश्यक जागा उरत नाही. विशेषतः डाळ, तांदूळ किंवा अशा प्रकारचे अन्नपदार्थ जे शिजताना फुलतं, ते अधिक प्रमाणात भरल्यास ही समस्या वाढते. शिजताना कुकरच्या आत वाफ तयार होते, पण ती वाफ बाहेर पडण्यासाठी जागा न मिळाल्यास दबाव खूप वाढतो. परिणामी कुकर फुटण्याचा मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे नेहमी कुकर संपूर्णपणे भरु नये थोडी जागा वाफेसाठी मोकळी ठेवावी.

कुकर फुटू नये म्हणून काय काळजी घ्यावी ?

१. नेहमी ISI मार्क असलेलाच कुकर घ्यावा. ISI (Indian Standards Institute) हे भारत सरकारने ठरवलेले गुणवत्ता व सुरक्षा मानक आहे. या प्रमाणपत्राचा अर्थ असा की संबंधित कुकरने सर्व आवश्यक सुरक्षा चाचण्या आणि निकष पूर्ण केले आहेत. अशा कुकरांची गुणवत्ता चांगली असते आणि ते अधिक सुरक्षित असतात. 

२. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी नेहमी कुकरच्या व्हेंट पाईपची नीट तपासणी करावी. व्हेंट पाईपमध्ये एखादी बारीक तार किंवा पिन घालून त्यात काही अडकलेलं आहे का, हे नक्की पाहावं. हा छोटासा उपाय मोठ्या अपघातापासून वाचवू शकतो.

३. जरी सेफ्टी व्हॉल्व वरून पाहताना व्यवस्थित वाटत असला, तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तो दरवर्षी बदलणं आवश्यक असतं. कारण कालांतराने त्याचा धातू झिजतो, त्यात तडे जातात यासाठी सेफ्टी व्हॉल्व दरवर्षी बदलणे गरजेचे असते.

४. प्रेशर कुकर संपूर्णपणे भरुन अन्नपदार्थ शिजवणं चुकीचे आहे. सर्वसाधारणपणे, कुकर त्याच्या एकूण क्षमतेच्या फक्त दोन-तृतीयांश (२/३) भागापर्यंतच भरलेला असावा.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.सोशल व्हायरल