Benefits of Warm Water with 1 Spoon Ghee : तूप हे आपल्या आहाराचा महत्वाचा भाग आहे. रोज जेवणाची किंवा वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो. अनेक लोक ते पोळीवर लावून, डाळ-भाजीमध्ये घालून किंवा ग्रेव्हीला तडका देण्यासाठी वापरतात. तुपाने टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतात. अशात रोज जर एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप टाकून प्याल तर फायदे दुप्पट मिळतील.
पोषक तत्वे
तुपात व्हिटामिन A, D, E, K यांसोबत फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि आयर्नसारखे पोषक तत्व असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. याचे नियमित सेवन केल्यास पाचनसंस्था मजबूत राहते आणि हाडेही निरोगी राहतात. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट अमृत डेओल यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरील व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती दिली आहे. चला तर जाणून घेऊया…
पचनसंस्था मजबूत होते
जर आपल्याला नेहमीच पोटाच्या समस्या होत असतील, तर रोज सकाळी कोमट पाण्यात १ चमचा तूप टाकून पिणे सुरू करा. त्यामुळे आतड्यांची साफसफाई होते आणि पचनसंस्था मजबूत होते. अन्नाचे पचनही खूप सोपे होते.
अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता दूर होते
जर आपल्याला अॅसिडिटीची समस्या असेल किंवा पोट सहज साफ होत नसेल, तर हा उपाय अतिशय उपयुक्त आहे. कोमट पाण्यात तूप मिसळून प्यायल्यास अॅसिडिटी कमी होते आणि बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो.
सांधेदुखीत आराम
वय वाढल्यावर किंवा हिवाळ्यात सांधेदुखी खूप त्रासदायक होते. यापासून आराम मिळवण्यासाठी सकाळी उपाशीपोटी तूप मिसळलेलं कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं. यामुळे जॉइंट्स मजबूत होतात आणि लुब्रिकेटेड राहतात.
चेहऱ्यावरील डाग कमी होतात
रोज सकाळी तूप घातलेलं पाणी प्यायल्यास शरीर आतून डिटॉक्स होतं आणि टॉक्सिन्स बाहेर पडतात. याचा त्वचेवर खूप चांगला परिणाम होतो. परिणामी चेहऱ्यावरील डाग हळूहळू कमी होतात आणि त्वचा सतेज होते.
वजन कमी करण्यास मदत
कोमट पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यासही मदत मिळते. कारण हे पाणी प्यायल्यावर बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे जास्त खाणं टळतं. वजन कमी करण्याच्या प्रवासात हा उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो.
Web Summary : Adding a spoonful of ghee to warm water each morning offers multiple health benefits. Rich in vitamins and minerals, this practice aids digestion, relieves acidity and constipation, eases joint pain, reduces blemishes, and supports weight loss by promoting a feeling of fullness.
Web Summary : रोज सुबह गर्म पानी में एक चम्मच घी मिलाकर पीने से कई स्वास्थ्य लाभ मिलते हैं। विटामिन और खनिजों से भरपूर, यह पाचन में मदद करता है, एसिडिटी और कब्ज से राहत देता है, जोड़ों के दर्द को कम करता है, दाग-धब्बों को कम करता है और तृप्ति की भावना को बढ़ावा देकर वजन घटाने में सहायता करता है।