Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात बिंधास्त प्या ही पौष्टिक लस्सी, वजन कणभरही वाढणार नाही-पोटाला मिळेल थंडावा

उन्हाळ्यात बिंधास्त प्या ही पौष्टिक लस्सी, वजन कणभरही वाढणार नाही-पोटाला मिळेल थंडावा

Drink this nutritious lassi in summer, your stomach will feel cool : साखर न घालता करा मस्त लस्सी. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडाव्यासाठी खास.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2025 16:52 IST2025-05-07T16:51:25+5:302025-05-07T16:52:49+5:30

Drink this nutritious lassi in summer, your stomach will feel cool : साखर न घालता करा मस्त लस्सी. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडाव्यासाठी खास.

Drink this nutritious lassi in summer, your stomach will feel cool | उन्हाळ्यात बिंधास्त प्या ही पौष्टिक लस्सी, वजन कणभरही वाढणार नाही-पोटाला मिळेल थंडावा

उन्हाळ्यात बिंधास्त प्या ही पौष्टिक लस्सी, वजन कणभरही वाढणार नाही-पोटाला मिळेल थंडावा

उन्हाळ्याच्या दिवसात गारेगार पदार्थ हवेहवेसे वाटतात. चहाची जागाही एखादा थंड पदार्थ घेतो. (Drink this nutritious lassi in summer, your stomach will feel cool)विकतचे सोडायुक्त पदार्थ प्यावेसे वाटतात. त्याला तर इतर अनेक पौष्टिक पर्याय आपल्याला माहिती आहेत. काहींना सोडायुक्त पदार्थ आवडतात. तर काहींना गोड पदार्थ जसे की फालूदा, मिल्कशेक गारेगार लस्सी. पण अशा पदार्थांच्या कॅलरिज मोजल्या तर चक्करच येईल.  (Drink this nutritious lassi in summer, your stomach will feel cool)मात्र अशा गोड पदार्थांना जरासा ट्विस्ट देऊन ते पौष्टिकही करता येतात. अगदी थोडे बदल करायचे.

लस्सी हा पदार्थ भारतात फार लोकप्रिय आहे. पंजाबमध्ये लस्सी फार प्रसिद्ध आहे. लस्सी जरी मुळ पंजाबची असली तरी सगळीकडेच तिला मागणी आहे. घट्ट लस्सी, पातळ लस्सी, मटका लस्सी, शाही लस्सी अशा अनेक प्रकारच्या लस्सी असतात. मात्र सगळेच प्रकार भरपूर साखर घातलेले असतात. तुम्हाला गिल्टफ्री बिना साखरेची लस्सी प्यायची असेल तर ही रेसिपी पाहा. अगदीच सोपी आणि झटपट होणारी ही लस्सी चवीला भारी आहेच मात्र पौष्टिकही आहे.        

साहित्य
दही, खजूर, बदाम, पाणी, काजू, बेदाणे

कृती
१. छान गोड दही घ्या. जुने आंबट दही वापरू नका. लस्सी अजिबात चांगली होणार नाही. दही एका मिक्सरच्या भांड्यात ओता. त्यात साखर घाला. दही मस्त पातळ आणि मऊ करुन घ्या. साखही मिक्स होऊ द्या. 

२. एका खोलगट भांड्यात दही ओतून घ्या. भांड्यात पाणी घाला आणि भांड्याला चिकटलेले दहीही काढून घ्या. 

३. मिक्सरच्या भांड्यास भिजवलेले बदाम घाला. तसेच काजूही भिजवा आणि नंतरच वापरा. खजूराच्या बिया काढून घ्या. खजूराचा गर मिक्सरच्या भांड्यात घ्या. बदाम, काजू आणि खजूराची छान पेस्ट करुन घ्या. 

४. ती पेस्ट लस्सीत घाला आणि घुसळून घ्या. छान एकजीव करुन घ्या. लस्सीला वरुन सुकामेवा टाका. फ्रिजमध्ये ठेवा आणि गार करुन प्या. जर लगेच प्यायचे असेल तर दही मिक्सरला फिरवताना त्यात बर्फ घाला आणि तो ही मिक्सरमधून फिरवा. 
       

Web Title: Drink this nutritious lassi in summer, your stomach will feel cool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.