पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही तरी गरम प्यायला मज्जाच येते. चहा कॉफी तर आपण पितोच मात्र एखादं छान सूप प्यायची मज्जा काही वेगळीच आहे. संजीव कपूर यांनी पावसाळ्यासाठी खास पालक व कांद्याचे सूप अशी एक रेसिपी सांगितली आहे. (Drink Hot Spinach Soup in rain, Sanjeev Kapoor Special Recipe! )चवीला जेवढी मस्त करायला तेवढीच सोपी. बाहेर पाऊस आणि हातात गरमागरम सूप म्हणजे सुखच. ठरलेली नेहमी सूप रेसिपी तर कराच मात्र यंदाच्या पावसाळ्यात असे पालकाचे पौष्टिक सुपही जरूर प्या.
साहित्यतेल, कांदा, लसूण, पालक, मीठ, काळी मिरी, तमालपत्र, पाणी, दूध, लोणी
कृती१. कांदा छान बारीक चिरुन घ्यायचा. कांदा कमी घेऊ नका. भरपूर कांदा घ्यायचा. एक जुडी पालक घेत असाल तर दोन मध्यम किंवा मोठे कांदे घ्यायचे. छान पालकाची जुडी घेऊन यायची. व्यवस्थित निवडायची. छान धुवायची आणि बारीक चिरायची.
२. पालक एका पातेल्यात घ्यायचा आणि उकळवायचा. त्यात भरपूर पाण्या घ्यायचे. पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही. पालक उकळून झाल्यावर त्याचे पाणी टाकायचे नाही. गाळून घ्यायचे आणि गार करत ठेवायचे.
३. गॅसवर कढई तापत ठेवायची. त्यात चमचाभर तेल घालायचे. एक तमालपत्राचे पान घालायचे चार ते पाच काळी मिरी घालायच्या. (Drink Hot Spinach Soup in rain, Sanjeev Kapoor Special Recipe! )जरा काही सेकंदासाठी परतून घ्यायचे. परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेली लसूण घालायची. लसूण परतायची आणि मग बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा मस्त गुलाबी परतायचा.
४. कांदा परतून झाल्यावर त्यात पालकाची उकळलेली पाने घालायची. पालक व कांदा जरा परतला की त्यात चमचाभर मीठ घालायचे आणि गॅस बंद करायचा व मिश्रण गार करुन घ्यायचे. गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि मस्त पातळ वाटून घ्यायचे. वाटण्यासाठी वेगळे पाणी न वापरता पालकाचे उकळलेले पाणी घ्यायचे. त्यात पोषण तर असतेच शिवाय सूप घट्ट होते.
५. सूप पुन्हा जरा उकळायचे त्यात चमचाभर लोणी घालायचे आणि मग गरमागरम सुपाचा आस्वाद घ्यायचा.