आपण जेवण तयार करताना आमसूलाचा वापर करतो. पण हा स्वयंपाकघरात महिनों-महिने पडून राहणारा पदार्थ किती फायदेशीर आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का?(dried kokum is a magical food that makes summers easy ) सूप, चटणी, लोणचे, भाजी यांमध्ये आंबटपणासाठी आमसूल वापरले जाते. तसेच उष्ण पदार्थांपासून शरीराला त्रास होऊ नये, म्हणून आमसूलाचे पदार्थ खाल्ले जातात. खानदेशी जेवणात आमसूलाचे सार वगैरेचा समावेश असतो. (dried kokum is a magical food that makes summers easy )कारण खानदेशी जेवण तिखट व उष्ण असते. ते पचायला सोपे जावे, म्हणून त्यात आमसूलाचा वापर केला जातो.
आमसूल कोकमापासून तयार केले जाते. त्याची प्रोसेस फार किचकट असते. (dried kokum is a magical food that makes summers easy ) कोकमाच्या बिया काढून कोकमाचे तुकडे करून घेतले जातात. पाण्यातून ते स्वच्छ धुवून घेतल्यावर पाण्यापासून आगळ तयार केला जातो. नंतर साले उन्हात सुकवली जातात. परत आगळात घालून परत काही दिवस वाळवायची. असं ४ ते ५ वेळा केले जाते. नंतर कोकमाचे रूपांतर आमसूलात होते. गोड, खारट, साधी अशी आमसूले बाजारात मिळतात.
आयुर्वेदिक वैद्य, डॉक्टर सांगतात, आमसूलामुळे डिहायड्रेशन होत नाही. म्हणून त्याचा वापर उन्हाळ्यात जास्त केला जातो. आपली आजी भाजी, आमटी तयार करताना त्यात आमसूल घालते. कारण पित्तावर, उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी फार आधीपासून आमसूलांचा वापर केला जात आहे. उष्मा घात(सन स्ट्रोक) सारख्या समस्या आमसूलाच्या वापराने टाळता येतात.
आमसूलाचे फायदे
१. आमसूलामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने अशी अनेक सत्वे असतात. तसेच जीवनसत्वेही असतात. त्यामुळे शरीराला पोषकतत्त्वे मिळतात.
२. पोटात सतत आव पडत असेल तर, तेही आमसूलाने टाळता येते.आमसुलामुळे जुलाब बंद होतात.
३. सतत पित्ताच्या उलट्या होणार्यांसाठी आमसूल उत्तम. कारण ते पित्तशामक आहे. तसेच मळमळ कमी करते.
४. आमसूल पाचक म्हणून फार उपयुक्त आहे. पोटाचे त्रास आमसूलाच्या सेवनाने कमी होतात.
५. अंगावर उष्णता उठत असेल तर, त्याला आमसूलाचे पाणी लावले जाते. तसेच आमसूलाची साले चोळली जातात. त्याने पुळ्या लगेच नाहीशा होतात.
उन्हाळ्यात आमसूलाचा वापर करण्याची पद्धत या सगळ्या कारणांमुळे वर्षानुवर्षे सुरू आहे. यंदा तुम्हीही आमसूलाचा वापर करा आणि अनेक समस्या टाळा.