दक्षिण भारतातील अनेकांच्या आवडीचा पदार्थ डोसा. सकाळच्या नाश्त्यात, दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळी डोसा आवर्जून खाल्ला जातो.(dosa making tips) एक डोसा खाल्ला तरी पोट आपलं भरते. पचायला हलका असला तरी बनवताना मात्र अधिक कष्ट घ्यावे लागतात.(how to make perfect dosa) हॉटेलमध्ये डोश्याची चव चाखली आणि आपण घरीच तसा बनवायचा ट्राय केला तर अनेकदा तो जमत नाही. (non-stick dosa tricks)
कधी डोसा तव्याला चिकटतो?, कधी जाड होतो? तर कधी त्याची जाळीच पडत नाही.(South Indian dosa tips) इतके कष्ट घेण्याऐवजी आपण डोसा विकत आणून खाल्लेला बरा असं वाटू लागतं. घरी परफेक्ट क्रिस्पी डोसा तयार करणं खरंतर अवघड वाटतं.(restaurant style dosa) डोश्याचं बॅटर व्यवस्थित झालं नसेल तर किंवा डोसा वारंवार तव्याला चिकटत असेल तर एक सोपी ट्रिक वापरुन पाहा. यामुळे डोसा तव्याला चिकटणार नाही आणि परफेक्ट जाळीदार डोसा काही मिनिटांत तयार होईल.(dosa batter hack)
Maharashtra food : ऑफिसच्या डब्यासाठी करा चमचीत मसाला तोंडली, सहकारी विचारतील भाजीची रेसिपी
डोसा तव्याला चिकटू नये म्हणून सोपी पद्धत
1. सगळ्यात आधी पॅन मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. चांगले गरम झाल्यानंतर १ ते २ चमचे मीठ घाला आणि पसरवा. त्यानंतर मीठ पसरवून चमच्याने हलवत राहा. १ ते २ मिनिटांत मिठाचा रंग बदलेल. त्यानंतर स्वच्छ कापडाने किंवा टिश्यू पेपरने मीठ काढून घ्या.
2. पॅन स्वच्छ केल्यानंतर त्यावर तेल पसरवून घ्या. चमच्याच्या मदतीने तेल सर्वत्र पसरवून घ्या. यानंतर तवा डोसा बनवण्यासाठी सेट होईल.
3. मीठामुळे पॅन हा स्वच्छ होऊन गुळगुळीत होतो. ज्यामुळे डोसा तव्याला चिकटत नाही. ज्यामुळे तो जळण्याची समस्या कमी होते. जर आपल्याकडे जुना लोखंडी तवा असेल तर ही ट्रिक वापरुन पाहा.
4. तवा गरम केल्यानंतर बर्फ घासणे ही देखील चांगली ट्रिक आहे. बर्फ घासल्यानंतर त्याचे पाणी काढून टाका. पॅन स्वच्छ करा. त्यानंतर बॅटर व्यवस्थित पसरवून डोसा तयार करा. मस्त जाळीदार डोसा आपल्याला खायला मिळेल.