Lokmat Sakhi >Food > मुलांसाठी करा डोसा नूडल्स सांबार, पाहा डोशाच्या पिठाच्या खरपूस नूडल्स करण्याची भन्नाट आयडिया

मुलांसाठी करा डोसा नूडल्स सांबार, पाहा डोशाच्या पिठाच्या खरपूस नूडल्स करण्याची भन्नाट आयडिया

Dosa Noodles Recipe: डोशाचं पीठ वापरून त्यापासून नूडल्स करण्याचा एक मस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...(how to make dosa noodles?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 18:48 IST2025-08-26T17:30:56+5:302025-08-26T18:48:27+5:30

Dosa Noodles Recipe: डोशाचं पीठ वापरून त्यापासून नूडल्स करण्याचा एक मस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...(how to make dosa noodles?)

dosa noodles recipe, how to make dosa noodles, making noodles from dosa batter | मुलांसाठी करा डोसा नूडल्स सांबार, पाहा डोशाच्या पिठाच्या खरपूस नूडल्स करण्याची भन्नाट आयडिया

मुलांसाठी करा डोसा नूडल्स सांबार, पाहा डोशाच्या पिठाच्या खरपूस नूडल्स करण्याची भन्नाट आयडिया

Highlightsडोश्याच्या पिठाच्या नूडल्स कशा करायच्या?

इडली, डोसा हे पदार्थ अनेकांच्या आवडीचे. बहुसंख्य महाराष्ट्रीयन घरांमध्ये ते पदार्थ अगदी आवडीने खाल्ले जातात. आणखी एक मुख्य गोष्ट म्हणजे एकदाच एकाच प्रकारचं पीठ बनवून ठेवलं जातं आणि एक दिवस त्याचे डोसे, एक दिवस उत्तप्पे, अप्पे, इडली असं सगळंच बनवून खाल्लं जातं. आता या यादीमध्ये आणखी एक पदार्थ सामाविष्ट करा आणि तो पदार्थ म्हणजे नूडल्स.. होय डोश्याच्या पिठाच्या खूप चांगल्या, चवदार नूडल्स तयार होतात. त्या कशा करायच्या आणि कशा खायच्या ते पाहूया..

 

डोश्याच्या पिठाच्या नूडल्स करण्याची भन्नाट रेसिपी

डोश्याच्या पिठाच्या नूडल्स कशा करायच्या याची रेसिपी viyofoood या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आली आहे. या रेसिपीनुसार तुम्ही सगळ्यात आधी डोश्याचं पीठ घरी तयार करून घ्या किंवा मग विकत आणा.

गणेशोत्सव: तळणीच्या मोदकासाठी परफेक्ट सारण कसं करायचं? घ्या रेसिपी- मोदक होतील खमंग, चवदार

आता नेहमीप्रमाणे डोसा करण्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवा. तवा गरम झाल्यानंतर टोमॅटो केचअपची जी बॉटल असते तिच्यामध्ये डोशाचं पीठ भरा आणि त्याने तव्यावर पीठ सोडा. एकावर एक पीठ सोडू नका. उभ्या रेघा मारल्याप्रमाणे संपूर्ण तव्यावर पीठ पसरवून घ्या.

 

तवा चांगला गरम झाल्यानंतर त्यावर तुम्ही टाकलेल्या डोसा नूडल्सही गरम होतील आणि तव्यापासून वेगळ्या होतील. या नूडल्स तव्यावरून काढून घ्या. त्यावर सांबार घाला आणि गरमागरम खा..

चहाचं पाणी 'या' पद्धतीने वापरून केस धुवून तर पाहा! केसांच्या सगळ्या समस्या होतील छुमंतर..

किंवा या नूडल्स एका भांड्यात काढून तुम्ही त्यावर टाेमॅटो सॉस, शेजवान सॉस, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो अशा पद्धतीने चायनिज भेल करूनही खाऊ शकता. दोन्ही रेसिपी एकेकदा ट्राय करून पाहा. लहान मुलांनाही खूप आवडतील. 

 

Web Title: dosa noodles recipe, how to make dosa noodles, making noodles from dosa batter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.