शेवयांचा फारसा वापर आपण करत नाही. काही जण करतातही. पण शक्यतो खीर तयार करण्यासाठीच शेवया वापरल्या जातात. (Don't Make Shevaya Kheer, Now Make Soft Shevaya Idli.)शेवयांपासून काहीतरी वेगळा तयार केलेला पदार्थ म्हणजे मग शेवयांचा उपमा. अनेक जण शेवयांचा तिखट उपमा तयार करतात. तसेच गोड असा शिरा तयार केला जातो. शिवयांपासून हे तीन पदार्थच जास्त तयार केले जातात. पण सारखं काय तेच तेच? काही तरी वेगळं तयार करून बघा की. (Don't Make Shevaya Kheer, Now Make Soft Shevaya Idli.)शेवयांची इडली कधी ऐकली आहे का? नाही? तर ही घ्या रेसिपी. मस्त मऊ आणि खुसखुशीत अशा शेवयांच्या इडल्या तयार करून खा.
साहित्य(Don't Make Shevaya Kheer, Now Make Soft Shevaya Idli.)
शेवया, कांदा, कडीपत्ता, मोहरी, तेल, कोथिंबीर, हींग, दही, गाजर, चणाडाळ, उडदाची डाळ
कृती
१. एका भांड्यामध्ये दही घ्या. त्यामध्ये गाजर छान बारीक चिरून घाला. कांदाही मस्त बारीक चिरून घाला. त्यामध्ये शेवया घाला. कोथिंबीरही घाला.
२. तयार मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यामध्ये चवीपुरते मीठ घाला आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवा.
३. एका वाटीमध्ये पाणी घ्या. त्यामध्ये चणाडाळ भिजत घाला. त्याच वाटीत उडदाची डाळही घाला.
४. आता छान फोडणी तयार करून घ्या. फोडणीसाठी तेल गरम करून घ्या. त्यामध्ये कडीपत्ता टाका. मोहरी टाका. मोहरी तडतडू द्या. ती व्यवस्थित तडतडली की मग त्यामध्ये हिंग घाला.
५. भिजवलेल्या डाळ जरा कोरडी करून घ्या. मग फोडणीमध्ये टाका. असं केल्याने डाळी अति दाताखाली येत नाहीत.
६. तयार केलेली फोडणी आता मिश्रणामध्ये ओता. त्यामध्ये थोडं तेल घाला. इडली सॉफ्ट होते. ही इडली आपल्याला फुलवून घ्यायची नाही. त्यामुळे इनो किंवा सोडा वापरू नका.
७. इडली पात्राला तेल लाऊन घ्या. त्यावरती तयार मिश्रणाच्या इडल्या लावा. लहानच तयार करायच्या म्हणजे लगेच सुटतात.
८. १५ ते २० मिनिटांमध्ये अगदी मस्त इडली तयार होते. नारळाची चटणी तोंडी लावायला घ्या. अगदीच छान लागते.