Lokmat Sakhi >Food > साधे वाकले तरी कंबर दुखते? पाहा सतत कंबर दुखण्याची कारणे आणि उपाय

साधे वाकले तरी कंबर दुखते? पाहा सतत कंबर दुखण्याची कारणे आणि उपाय

Does your back hurt even when you bend over? See the causes and solutions for constant back pain : पाठ व कंबर सतत दुखत असेल तर पाहा काय औषध कराल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2025 14:58 IST2025-03-22T14:56:38+5:302025-03-22T14:58:36+5:30

Does your back hurt even when you bend over? See the causes and solutions for constant back pain : पाठ व कंबर सतत दुखत असेल तर पाहा काय औषध कराल.

Does your back hurt even when you bend over? See the causes and solutions for constant back pain | साधे वाकले तरी कंबर दुखते? पाहा सतत कंबर दुखण्याची कारणे आणि उपाय

साधे वाकले तरी कंबर दुखते? पाहा सतत कंबर दुखण्याची कारणे आणि उपाय

अंगदुखी ही फारच कॉमन अशी समस्या आहे. सध्या चारात एकाला हा त्रास असतोच. त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. मात्र तो त्रास सहन करावा लागतोच. (Does your back hurt even when you bend over? See the causes and solutions for constant back pain)कोणाचा हात दुखतो तर कुणाची पाठ. काहींचे पाय दुखतात, तर काहींची मान दुखते. या साऱ्या दुखण्यांपासून वाचण्यासाठी आपण विविध उपाय करून बघतोच. ट्रिटमेंट घेतो तसेच औषध घेतो. मात्र अनेकदा तो त्रास पुन्हा सुरू होतो. (Does your back hurt even when you bend over? See the causes and solutions for constant back pain)असाच एक त्रास म्हणजे कंबरदुखी. अनेकांची कंबर सतत दुखत असते. एकदा का कंबर दुखायला लागली की कोणतेही काम व्यवस्थित करता येत नाही. सतत त्रास जाणवत राहतो. कंबरेमुळे अख्खी पाठच मग ठणकायला लागते. मायो क्लिनिक या पेजवर सांगितल्यानुसार,  या कंबरदुखीची अनेक कारणे असतात,  ती व उपाय जाणून घ्या. 

१. ज्यांचे पोट मोठे आहे, त्यांची कंबर जास्त दुखते. कारण पुढील शरीराच्या वजनाचा भार पाठीवर येतोच. त्यामुळे स्थुल व्यक्तींमध्ये कंबरदुखी जास्त असते.  (Does your back hurt even when you bend over? See the causes and solutions for constant back pain)

२. सतत बसून काम करणार्‍यांची कंबर दुखते. एकाच स्थितीमध्ये शरीर बराच वेळ राहील्याने ते आखडते. एकदा का आखडले की मग दुखायला लागते. त्यात जर ऑफीसमध्ये कायम एसी सुरू असेल तर मग हा त्रास वाढतो. कमी होत नाही.

३. रोजच्या रोज गाड्या चालणार्‍यांनाही पाठीचा व कंबरेचा त्रास होतो. लांबच्या प्रवासासाठी दुचाकी वापरणाऱ्यांना हा त्रास होतो. मणक्याचे आजार उद्भवतात. 

४. शरीरामध्ये जीवनसत्त्व 'डी' कमी झाल्याने कंबर दुखायला लागते. बसताना पोक काढून बसणाऱ्यांची पाठही काही कालावधीनंतर दुखायला लागते. 

कंबरदुखी, पाठदुखी या त्रासांवर काही घरगुती उपाय आहेत.  

१. अश्वगंधाची पावडर किंवा गोळी घेतल्याने कंबरदुखी बरी होते. हाडांच्या मजबुतीसाठी तसेच शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी अश्वगंधा फार गुणकारी आहे.  

२. तुरटीच्या पाण्याचा शेक पाठीला व कंबरेला द्यायचा. तुरटी फार औषधी असते. 

३. योगासने केल्याने कंबरच काय इतरही अवयवांचे आरोग्य सुधारते. त्यामुळे रोज अर्धा तास योगासने करत जा. सगळी दुखणी बंद होतील.      
 

Web Title: Does your back hurt even when you bend over? See the causes and solutions for constant back pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.