प्रत्येक भारतीय घरांमध्ये मोठ्या आवडीने आणि हौसेनं गरमागरम, वाफाळता चहा प्यायला जातोच. सकाळची सुरुवात असो, कामातून मिळालेला ब्रेक असो, किंवा पाहुण्यांचे स्वागत असो; चहाशिवाय दिवस अपूर्ण वाटतो. त्यामुळे घरात चहा पावडरचा साठा नेहमीच असतोच आणि आपण ती महिनोंमहिने डब्यात भरून ठेवतो. पण, तुम्हाला माहित आहे का? ज्याप्रमाणे इतर खाद्यपदार्थांना एक्सपायरी डेट असते, त्याचप्रमाणे आपल्या आवडीच्या चहा पावडरला देखील 'एक्स्पायरी डेट' आणि 'शेल्फ लाईफ' असते! आपल्यापैकी अनेकांना वाटतं की चहा पावडर ही दीर्घकाळ टिकते आणि तिची एक्स्पायरी डेट नसते, पण खरं तर तसे नाही!(How to know if the tea is expired),
चहा पावडरलाही एक ठराविक शेल्फ लाईफ आणि एक्स्पायरी डेट असते. जास्त दिवस साठवून ठेवलेली किंवा ओलसर ठिकाणी ठेवलेली चहा पावडर तिचा सुगंध, चव आणि गुणधर्म गमावते. त्यामुळे चहा ताजा, सुगंधी आणि आरोग्यदायी राहण्यासाठी चहा पावडर किती दिवस वापरावी आणि योग्य पद्धतीने कशी साठवावी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.चहाची खरी चव आणि सुगंध फक्त चहा पावडर फ्रेश असतानाच मिळते. तुमच्या घरात असलेली चहा पावडर खरंच किती दिवस फ्रेश राहते, तिची एक्सपायरी डेट कधी संपते आणि (Does tea leaf have an expiry date) ती जास्त काळ वापरण्यायोग्य ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी, याबद्दल काही खास टिप्स जाणून घेऊयात.
चहा पावडरला एक्स्पायरी डेट असते की नाही ?
चहा पावडरला देखील एक्स्पायरी डेड असते. चहामध्ये नैसर्गिकरित्या तेल आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. चहा पावडर ओलावा, हवा आणि प्रकाशाच्या संपर्कात आल्यास त्यातील नैसर्गिक तेल आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागते आणि चहा पावडर खराब होते. एक्स्पायरी झाल्यानंतर चहा पावडर विषारी किंवा नुकसानकारक होत नाही, पण तिचा स्वाद, रंग, आणि सुगंध कमी होऊ लागतो. जर कोणी एक्स्पायरी झालेला चहा पीत असेल, तर त्याला त्याची चव आणि सुगंध गमावल्याचे किंवा कधीकधी हलकासा फंगस लागल्याचा वास आल्याचे लगेच जाणवते.
'असा' कांदा करतो तब्येतीचा वांदा! कांदा विकत घेताना कायम लक्षात ठेवा ५ गोष्टी...
कोणती चहा पावडर किती दिवस टिकते ?
१. ब्लॅक टी :- ब्लॅक टी चहा पावडर १ ते २ वर्षांपर्यंत चांगली टिकते. पण जेव्हा ती सुकी आणि थंड असते, तेव्हा ती ६ ते १२ महिने अधिक चांगली टिकते.
२. ग्रीन टी किंवा हर्बल टी पावडर :- ग्रीन टी किंवा हर्बल टी पावडर नेहमी एअरटाईट कंटेनरमध्येच भरून स्टोअर करुन ठेवावी.
३. उलॉन्ग, व्हाईट टी पावडर :- उलॉन्ग, व्हाईट टी पावडर ही साधारणपणे १ वर्ष चांगली टिकून राहते.
४. तुळस टी आणि कॅमोमाईल टी पावडर :- ही चहा पावडर ६ ते १२ महिने चांगली टिकून राहते.
जर चहाची पावडर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवली आणि तिला ऊन, ओलावा आणि उष्णतेपासून दूर ठेवली तर ती लवकर खराब न होता दीर्घकाळ चांगली टिकून रहाते.
