Join us

काकडी चिरुन घासली तर काकडीचा कडवडपणा खरंच कमी होतो? कडू काकडी खाऊ नका, पाहा खरं काय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 16:45 IST

Rubbing Cucumber Tip: काकडीतील हा कडवटपणा कमी करण्यासाठी लोक काकडी टोक कापून घासतात. घासताना काकडीतून पांढरा फेस निघतो.

Rubbing Cucumber Tip: उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक भरपूर काकडी खातात. कारण यात पाणी भरपूर असतं. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते. अशात तुम्हीही अनेकदा पाहिलं असेल की, काही काकड्या जरा कडवट लागतात. मग काकडीतील हा कडवटपणा कमी करण्यासाठी लोक काकडी टोक कापून घासतात. घासताना काकडीतून पांढरा फेस निघतो. तेव्हा असं समजलं जातं की, काकडीचा कडवटपणा निघून गेला आहे. पण खरंच असं केल्यानं काकडीचा कडवटपणा निघून जातो की ही फक्त अफवा आहे. 

कोपरा घासल्यानं काकडीचा कडवटपणा जातो की नाही जे जाणून घेण्याआधी काकडी कडवट का लागते हे जाणून घेऊ. तर काकडीमधील नॅचरल तत्व कुकुर्बिटासिन यामुळे काकडीमध्ये कडवटपणा येतो.

कुकुर्बिटासिन जास्त प्रमाणात काकडीच्या टोकावर असतं. हे तत्व काकडीसाठी एखाद्या सेल्फी मेकॅनिझमसारखं काम करतं. जेणेकरून शेतात फिरणारे जीव याला खाऊ नये. 

जेव्हा तुम्ही काकडीचा कोपरा टाकता आणि त्यावर थोडं मीठ टाकून घासता तेव्हा एकप्रकारची ऑस्मोसिस प्रोसेस सुरू होते. मीठ काकडीतील सेल्समधून पाणी आणि कुकुर्बिटासिन खेचतं. त्यामुळे काकडीतून फेस बाहेर येऊ लागतो.

काकडीमधून निघणारा फेस या गोष्टीचा संकेत असतो की, काकडीचा कडवटपणा आता निघून गेला आहे. अनेकदा हा उपाय यशस्वी ठरतो, पण नेहमीच असं करून काकडीचा कडवटपणा जाईलच असंही नाही. मात्र, काकडीचा कडवटपणा दूर करण्यासाठीचा हा उपाय एक वैज्ञानिक पद्धत आहे. ही काही अफवा नाही.

टॅग्स :अन्नआरोग्य