Maida Facts : मैद्याच्या वापर वेगवेगळ्या पदार्थ बनवण्यासाठी रोज केला जातो. भरपूर लोक रोज मैद्याने बनवलेले वेगवेगळे पदार्थ खात असतात. पण नेहमीच मैद्याबाबत म्हटलं जातं की, मैदा खाल्ल्यानंतर पोटात आतड्यांना चिकटून राहतो. ज्यामुळे पोट बिघडतं. मुळात मैद्यातून पोषक तत्व आणि फायबर पूर्णपणे काढलं जातं. अशात रोज मैद्याचं सेवन केल्यानं लठ्ठपणा, टाइप २ डायबिटीस, हृदयरोग, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी आजारांचा धोका वाढतो. अशात मैदा आतड्यांना चिकटून बसतो का? यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊ.
मैद्याबाबत समज-गैरसमज
आजकाल वाढते आजार बघता बरेच लोक फिटनेस आणि हेल्थबाबत भरपूर अलर्ट राहू लागले आहेत. हेच कारण आहे की, अनहेल्दी गोष्टी टाळून हेल्दी फूड्सवर लक्ष देत आहेत. पण तरीही असेही भरपूर लोक आहेत जे काळजी न घेता अनहेल्दी पदार्थ खातात. मैद्यापासून तयार पदार्थ आरोग्यासाठी नुकसानकारक मानले जातात.
मैदा आतड्यांमध्ये चिकटतो का?
मैदा आतड्यांमध्ये चिकटतो की नाही याबाबत एक्सपर्ट सांगतात की, मैदा कधीच कच्चा खाल्ला जात नाही. खाण्याआधी तो तळला किंवा शिजवला जातो. त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे की, मैदा आतड्यांमध्ये चिकटतो. एक्सपर्ट म्हणाले की, जर कुणी कच्चा मैदा खाल्ला तर तो पचन तंत्रातून गेल्यावर सरळ कार्बोहायड्रेटच्या रूपात शरीरात अवशोषित होईल.
मैद्याचे दुष्परिणाम
एक्सपर्ट सांगतात की, मैद्यात फायबरचं प्रमाण कमी आढळतं. अशात तो जास्त खाल्ल्यानं अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या होतात. तसेच मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. मैद्याने पचन तंत्रावर वाईट प्रभाव पडतो. सोबतच ब्लड शुगर लेव्हलही अचानक वाढते. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांसाठी मैदा नुकसानकारक मानला जातो.
हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, मैद्यात ग्लूटेनचं प्रमाणही जास्त असतं. जे आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. ग्लूटेन एक प्लांट कंपाउंड आहे जे गट हेल्थसाठी खराब असतं. मैदा किंवा मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील इतर अवयवांवरही वाईट प्रभाव पडतो. अशात एक्सपर्ट जास्त मैदा न खाण्याचा सल्ला देतात.