Join us

इडली-डोसा खाल्ल्यावर पोटात गॅस होतो, पोट फुगतं का? एक्सपर्टनी सांगितलं याचं एक मुख्य कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 15:51 IST

Why does idli cause gas: बऱ्याच लोकांची तक्रार असते की, इडली किंवा डोसा खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटात  गॅस किंवा ब्लोटिंगची म्हणजे पोट फुगण्याची समस्या होते. त्यामुळे इच्छा असूनही ते हे पदार्थ खाऊ शकत नाहीत.

Why does idli cause gas: पोहे, उपमा, वडापाव, मिसळ यासोबतच भारतात जास्तीत जास्त लोक सकाळी नाश्त्यात इडली आणि डोसा खातात. दोन्ही पदार्थांसोबत मिळणारी खोबऱ्याची टेस्टी चटणी आणि सांबार खाण्याची लोकांना जणू चटकच लागली आहे. इडली आणि डोसा टेस्टी तर असतातच, सोबतच आरोग्याला अनेक फायदे देणारा नाश्ता असतो. पण बऱ्याच लोकांची तक्रार असते की, इडली किंवा डोसा खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटात  गॅस किंवा ब्लोटिंगची म्हणजे पोट फुगण्याची समस्या होते. त्यामुळे इच्छा असूनही ते हे पदार्थ खाऊ शकत नाहीत. तुम्हाला सुद्धा असं होत असेल तर यावर काय उपाय करावा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय सांगतात एक्सपर्ट?

याबाबत फेमस सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी सांगितलं की, 'इडली आणि डोसा दोन्हीही आरोग्यादायी पदार्थ आहेत. पण जास्तीत जास्त लोक इडली-डोसा खाताना एक चूक करतात. ज्यामुळे त्यांना गॅस, सूज किंवा अपचनसारख्या समस्या होतात'.

न्यूट्रिशनिस्ट पुढे सांगतात की, वेळ वाचवण्याच्या नादात जास्तीत जास्त लोक रेडिमेड इडली-डोसा बॅटरल विकत आणतात. पण हीच चूक तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते.

रेडिमेड बॅटर नुकसानकारक का?

श्वेता शाह यांच्यानुसार, रेडिमेड इडली-डोसा बॅटर नेहमीच 12 तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ फर्मेंट केलं जातं. ज्यामुळे बॅटरमध्ये अधिक तयार करणारे बॅक्टेरिया विकसित होतात. जेव्हा तुम्ही या बॅटरनं इडली किंवा डोसा बनवून खाता तेव्हा पोट फुगतं किंवा गॅसची समस्या होते. त्यामुळे कोणतंही बॅटर केवळ 7 ते 8 तासांसाठीची फर्मेंट करावं. सोबतच 24 तासांच्या आत त्याचा वापर करावा.

बोरिक अॅसिडही ठरतं कारण..

काही रेडिमेड बॅटरमध्ये बोरिक अॅसिड टाकलं जातं. जेणेकरून फर्मेंटेड बॅटरचा वास येऊ नये. पण बोरिक अॅसिड पोटासाठी चांगलं नसतं. यानं आरोग्याचं नुकसान होतं. त्यामुळे असं बॅटर टाळलं पाहिजे. ज्यात बोरिक अॅसिड असेल.

EColi बॅक्टेरिया

पुढे श्वेता शाह सांगतात की, बॅटरला फर्मेंटेड करण्यासाठी काही ईकोली बॅक्टेरिया त्यात मिक्स करतात. जेव्हा ईकोली बॅक्टेरिया जास्त वेळासाठी यात टाकले जातात तेव्हा बॅटरमध्ये जास्त गॅस तयार होतो आणि त्यामुळे तुम्हालाही पोटासंबंधी समस्या होतात.

काय कराल उपाय?

गॅस, पोट फुगणे अशा समस्या टाळण्यासाठी न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, नेहमी इडली-डोस्याचं बॅटर घरीच तयार करा. बाजारातून रेडिमेड बॅटर आणू नका. हाच तुमचा बेस्ट उपाय आहे.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स