Join us

केळी खाऊन चरबी वाढते का? आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात केळी खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 20:02 IST

Banana Facts : न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह सांगतात की, केळी खाण्यात चुकीचं काहीच नाही. यानं तुमचं वजन वाढत नाही.

Banana Facts : केळी एक सुपरफूड मानलं जातं. कारण यात अनेक पोषक तत्व असतात. पोटासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी नियमितपणे केळी खाण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. लहान असो वा मोठे सगळ्यांना केळी खाणं आवडतं. पण असेही बरेच लोक आहेत जे केळी खात नाहीत. कारण त्यांना असं वाटतं की, केळी खाल्ल्यानं त्यांचं वजन वाढेल. पण खरंच असं होतं का? चला जाणून घेऊ.

केळी खाऊन वजन वाढतं का?

न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह सांगतात की, केळी खाण्यात चुकीचं काहीच नाही. यानं तुमचं वजन वाढत नाही. फक्त केळी खाताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. 90च्या काळात एक चूक अशी करण्यात आली की, आपण सगळ्यांना सांगितलं की, केळी खूप गोड आहेत. त्यामुळे ती खाल्ल्यास वजन वाढतं. त्यामुळे बरेच लोक केळी खाणं टाळतात. पण असं अजिबात नाहीये. केळी खाल्ल्यानं वजन वाढत नाही.

त्यांनी पुढे सांगितलं की, रोज एक केळे खाल्ल्यानं वेगवेगळे स्त्री रोग दूर राहतात. व्हिडिओत सांगण्यात आलं की, यूटेरस आणि हार्मोनशी संबंधित अनेक समस्या आजकाल खूप वाढल्या आहेत. अशात जर तुम्ही रोज एक केळे खाल्ले तर तुम्हाला डॉक्टरकडे कमी जावं लागेल. कारण या समस्या केळ्याच्या मदतीनं दूर होतात. केळे खाल्ल्यानं  हार्मोन रेगुलेट होण्यास मदत मिळते.

कुणी खाऊ नये?

केळी खाण्याआधी तुम्हाला तुमचा बॉडी टाइप जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच केळे खावेत. त्या म्हणाल्या की, जर तुम्हाला कफ सतत होत असेल तर तुम्ही केळे खाणं टाळलं पाहिजे. कारण केळी खाल्ल्यानं डायजेशन स्लो होतं आणि तुम्हाला सुस्त येऊ शकते.

पण जर तुमचं शरीर वात आणि पित्ताचं असेल तर हे फळ तुमच्यासाठी सुपरफूड ठरेल. मात्र, अशा बॉडी टाइपच्या लोकांना ही काळजी घ्यावी लागेल की, एका दिवसात केवळ एकच केळे खायचे आहे.

केळी कधी आणि कशा खाव्यात?

आता मुद्दा येतो की, केळी कशी खावीत. याबाबतही एक्सपर्ट सांगतात की, केळी नेहमीच दिवसाच्या पहिल्या भागात खावीत. कधीही केळी दूध किंवा दह्यासोबत मिक्स करू नये. नुसती केळी खाऊनही तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

टॅग्स :अन्नआरोग्य