Lokmat Sakhi >Food > लसणाचे अनेक फायदे तर आहेच, पण 'या' 3 गोष्टींसोबत खाणं टाळावा; वाचा काय म्हणाले डॉक्टर...

लसणाचे अनेक फायदे तर आहेच, पण 'या' 3 गोष्टींसोबत खाणं टाळावा; वाचा काय म्हणाले डॉक्टर...

When Not to eat Garlic: जर चुकीच्या पद्धतीनं लसूण खाल्ला तर फायद्यांऐवजी नुकसान होऊ शकतं. काही गोष्टींसोबत लसूण खाल्ल्यास गंभीर समस्या होऊ शकतात. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 13:03 IST2025-05-24T12:51:24+5:302025-05-24T13:03:23+5:30

When Not to eat Garlic: जर चुकीच्या पद्धतीनं लसूण खाल्ला तर फायद्यांऐवजी नुकसान होऊ शकतं. काही गोष्टींसोबत लसूण खाल्ल्यास गंभीर समस्या होऊ शकतात. 

Doctor tells do not eat garlic with 3 things wrong food | लसणाचे अनेक फायदे तर आहेच, पण 'या' 3 गोष्टींसोबत खाणं टाळावा; वाचा काय म्हणाले डॉक्टर...

लसणाचे अनेक फायदे तर आहेच, पण 'या' 3 गोष्टींसोबत खाणं टाळावा; वाचा काय म्हणाले डॉक्टर...

When Not to eat Garlic: लसणाचा वापर भारतीय किचनमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. इतकंच नाही तर लसणाचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. कारण यात अनेक औषधी गुण असतात. त्यामुळे आयुर्वेदातही लसणाला खूप महत्व आहे. लसूण खाण्याचे अनेक फायदे असले तरी जर चुकीच्या पद्धतीनं लसूण खाल्ला तर फायद्यांऐवजी नुकसान होऊ शकतं. काही गोष्टींसोबत लसूण खाल्ल्यास गंभीर समस्या होऊ शकतात. 

काय सांगतात एक्सपर्ट?

आयुर्वेदिक डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांनी याबाबतचा एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ज्यात त्यांना लसूण कशासोबत खाऊ नये याबाबत माहिती दिली आणि याची कारणंही सांगितली. इतकंच नाही तर असं केल्यास लिव्हरचं नुकसान होऊ शकतं आणि पचनही बिघडू शकतं असं ते म्हणाले. 

कशासोबत खाऊ नये लसूण?

रक्त पातळ करणाऱ्या औषधांसोबत

डॉक्टरांनी सांगितलं की, लसणांमध्ये नॅचरली रक्त पातळ करण्याचे गुण असतात. अशात जर तुम्ही रक्त पातळ करणारी काही औषधं घेत असाल तर लसूण अधिक खाणं महागात पडू शकतं. यामुळे रक्तस्रावाचा धोका वाढतो. एका शोधातून समोर आलं आहे की, लसण खाण्यासोबतच रक्त पातळ करण्याची औषधं घेतली तर रक्त वाहण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अशी काही औषधं घेत असाल तर लसूण चुकूनही खाऊ नये.

अल्कोहोलसोबत

डॉक्टरांनुसार, दारू पिण्याच्या आधी किंवा नंबर लसूण खाल्ल्यानं लिव्हरवर प्रभाव पडतो. लसणातील तत्व आणि अल्कोहोल एकत्र झाल्यावर लिव्हरची काम करण्याची क्षमता प्रभावित होऊ शकते. सोबतच पचनासंबंधी समस्यांचा धोकाही वाढतो. अल्कोहोलसोबत लसूण खात असाल तर पोटात जळजळ, अपचन, अॅसिड रिफ्लक्स अशा समस्या होऊ शकतात. 

ग्रीन टी सोबत

तसेच ग्रीन टी पिण्याच्या काही वेळआधी आणि नंतर लसूण न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. लसूण आणि ग्रीन टी दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण या एकत्र कधीही खाऊ-पिऊ नये. ग्रीन टीमधील कॅफीन आणि इतर तत्व सक्रिय होतात, जे लसणासोबत मिळून पोटात जळजळ आणि अॅसिडिटीची समस्या निर्माण करू शकतात. दोन्हीतील तत्व सोबत आले तर पचन तंत्र बिघडतं. ज्यामुळे गॅस, अपचन आणि पोटासंबंधी इतरही समस्या होऊ शकतात.

Web Title: Doctor tells do not eat garlic with 3 things wrong food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.