Healthiest way to drink coffee : जगभरातील भरपूर लोक रोज कॉफी पितात. चहानंतर हे सगळ्यात जास्त प्यायलं जाणारं ड्रिंक मानता येईल. कॉफीची टेस्ट तर सगळ्यांनाच आवडते, सोबतच तिचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. कॉफीने मूड चांगला होतो, मेंदू सक्रिय ठेवते, फोकस वाढवते आणि लिव्हरसाठी फायदेशीर मानली जाते. कॉफीमध्ये असलेले पॉलीफेनॉल्स पोटातील चांगल्या बॅक्टेरिया वाढवतात आणि शरीराला ऊर्जा देतात.
पण अशातही एक्सपर्ट सांगतात की लोक कॉफी पिताना काही सामान्य पण मोठ्या चुका करतात, ज्यामुळे कॉफीचे फायदे कमी होतात किंवा ती नुकसानकारकही ठरू शकते. तर जाणून घेऊया त्या चुका कोणत्या आहेत.
एक्सपर्ट काय सांगतात?
AIIMS, हार्वर्ड आणि स्टॅनफर्ड येथून ट्रेनिंग घेतलेले गॅस्ट्रोएंटेरॉलॉजिस्ट व लिव्हर स्पेशलिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये या विषयावर माहिती दिली आहे. ते सांगतात की, कॉफी पिताना लोक सर्वात जास्त 3 चुका करतात, ज्यामुळे कॉफीचे फायदे हवे तसे मिळत नाहीत.
कॉफीमध्ये साखर घालणे
डॉ. सेठी सांगतात की कॉफीमध्ये साखर घालणे ही सर्वात मोठी चूक आहे. साखर ब्लड शुगर पटकन वाढवते. शरीरात इन्फ्लेमेशन म्हणजेच सूज निर्माण करू शकते. यामुळे दीर्घकालीन आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे साखर टाळा. जर गोड आवडत असेल तर स्टेव्हिया किंवा मोंक फ्रूट वापरू शकता. फक्त लक्षात ठेवा यात Erythritol नसावा.
ऑर्गेनिक कॉफी न वापरणे
कॉफी ही जगातील सर्वात जास्त कीटनाशक वापरली जाणारी पिकांपैकी एक आहे. नॉन-ऑर्गेनिक कॉफीत हे केमिकल्स तुमच्या शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे ऑर्गेनिक कॉफीच निवडा. यामुळे चवही चांगली लागते आणि आरोग्यालाही फायदा होतो.
अॅसिडिटी असूनही सामान्य कॉफी पिणे
अनेकांना अॅसिडिटी किंवा अॅसिड रिफ्लक्सची समस्या असते आणि ते कॉफी पूर्णपणे सोडून देतात. पण डॉक्टर सांगतात आधी कॉफीचा प्रकार बदला. जर अॅसिडिटी होत असेल तर डार्क रोस्ट कॉफी प्या. यात कॅफीन कमी असतं. जर अॅसिडिटीची समस्या नसेल तर लाइट रोस्ट कॉफी सर्वोत्तम कारण यात पॉलीफेनॉल जास्त असतात.
कॉफी पिण्याची योग्य पद्धत
डॉ. सेठी सांगतात की योग्य पद्धतीने घेतल्यास कॉफी मेंदूसाठी, पोटासाठी आणि लिव्हरसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. पण जर तुम्ही त्यात साखर घालत असाल, खराब क्वालिटीची कॉफी पित असाल, तुमच्या पचनानुसार योग्य रोस्ट निवडत नसाल, तर तुम्हाला कॉफीचे खरे फायदे मिळणार नाहीत.
