Join us

काय म्हणता, कॉफीत केळी कालवून खायची? आणि या कॉफी-केळीचे फायदे काय, वाचा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 17:13 IST

Coffee and Banana Combination : तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर की, हे काय कॉम्बिनेशन आहे आणि यानं शरीराला काय फायदे मिळतात? मात्र, याचे फायदे वाचाल तर तुम्हीही अवाक् व्हाल.

Coffee and Banana Combination : काही पदार्थ असे असतात जे एखाद्या दुसऱ्या पदार्थासोबत मिळून खाल्ल्यास टेस्टचा आणखी जास्त आनंद येतो. सोबतच शरीराला पोषणही दुप्पट मिळतं. डाळी-भात, दूध-केळी, तीळ-गूळ असे अनेक पदार्थ आहेत जे एकत्र खाल्ले तर शरीराला भरपूर फायदे मिळतात. काही ठिकाणी असे काही कॉम्बिनेशन असतात, ज्याबाबत वाचल्यावर लोक बुचकळ्यात पडतात. असंच एक कॉम्बिनेशन म्हणजे कॉफी आणि केळी. तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर की, हे काय कॉम्बिनेशन आहे आणि यानं शरीराला काय फायदे मिळतात? मात्र, याचे फायदे वाचाल तर तुम्हीही अवाक् व्हाल.

हेमाटोलॉजी ऑनकोलॉजी एक्सपर्ट डॉ. रवि गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करून या अजब कॉम्बिनेशनची माहिती दिली. केळी कॉफीमध्ये टाकून खाणं एक आजार दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलं होतं.

कशासाठी झाली होती सुरूवात?

डॉ. रवि यांनी सांगितलं की, कॉफीमध्ये केळी टाकून खाल्ल्यानं शरीराला भरपूर फायदे मिळतात. या वेगळ्या कॉम्बिनेशनची सुरूवात साउथ कोरियामध्ये झाली होती. इथे मालन्यूट्रिशनची खूप जास्त समस्या झाली होती. ही समस्या दूर करण्यासाठी डेअरी कंपन्यांनी हा मार्ग काढला होता. या आजारात शरीर पोषणाच्या कमतरतेमुळे वाळत होतं म्हणजे शरीराचा संगाडा होत होता. म्हणजेच कुपोषण दूर करण्यासाठी या कॉम्बिनेशनचा वापर केला जात होता.

हेल्दी फ्रूट केळ

डॉक्टरांनुसार, डेअरी कंपन्यांनी कॉफीमध्ये दूध आणि एक हेल्दी फळ टाकण्याचा विचार केला. केळ्यात नॅचरल शुगर, पोटॅशिअम आणि नॅचरल डायटरी फायबर असतं. जे पोटासाठी फार चांगलं असतं. केळ्यानं कॉफीचा कडवटपणा आणि अॅसिडिटी कमी होते. डॉक्टरांनी हे एक फार चांगलं कॉम्बिनेशन असल्याचं म्हटलं आहे.

केळी खाण्याचे फायदे

ब्लड शुगर कंट्रोल राहते

डायजेशन चांगलं राहतं

हृदयासाठी फायदेशीर

पोट जास्त वेळ भरलेलं राहतं

किडनीचं आरोग्य चांगलं राहतं

वजन वाढण्यास मदत मिळते

कॉफीचे फायदे

एनर्जी वाढते

टाइप २ डायबिटीसचा धोका कमी होतो

मेंदुच्या आरोग्यासाठी फायदेशीर

वेट मॅनेजमेंटमध्ये फायदेशीर

डिप्रेशनचा धोका कमी

लिव्हरच्या आजारापासून बचाव

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स