आपण भाजीत, आमटीत सगळ्यातच आलं वापरतो. चहातही आलं वापरतो. एखाद्या वेगळ्या खमंग पदार्थातही आलं वापरतो. आलं लसुण पेस्ट सर्व तिखट पदार्थांत वापरतो. (Do you use ginger in cooking every day but don't know about ....)हे आलं आपल्या आहारात आपण सतत वापरत असतो. पण ते का वापरतो, हा विचार केला आहे का? आजीने आईला वापरायला शिकवले, आईने आपल्याला शिकवले. (Do you use ginger in cooking every day but don't know about ....)म्हणून ते पिढ्यानुपिढ्या वापरले जात आहे. आल्यासारख्या पदार्थांचा आपण फार विचार करत नाही. अशा पदार्थांचे महत्त्व आपल्याला माहिती नसते. आल्याचे अनेक फायदे आहेत. म्हणून आलं प्रत्येक पदार्थात वापरण्याची पद्धत आपल्याकडे आहे.(Do you use ginger in cooking every day but don't know about ....)
बटाट्यासारखे पदार्थ वापरताना आपण आलं वापरतोच. कारण आलं पोटात गॅस होण्यापासून थांबवते. पचनसंस्था सुरळीत करते. आपल्या रोजच्या वापराच्या डाळीमुळे वाताचा त्रास होतो. तो होऊ नये, म्हणून आमटीला हिंग-आल्याची फोडणी देतात. आलं चवीसाठी गरजेचे नाही, असं समजून ते वापरणं काही जण कमी करतात. तसे न करता ते वापरणे शरीरासाठी गरजेचे असते.
आल्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व 'सी' असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्वचेसाठी ही आलं गरजेचे असते. आलं सर्दी, खोकला, कफ, ताप अशा आजारांवर मात करण्यास मदत करते. यात अँटीइंफ्लेमेटरी पोषकतत्वे असतात. त्यामुळे शरीरातील जीवाणू- किटाणू मारण्यासाठी आल्याचा फायदा होतो. डोकेदुखीचा त्रास असणार्यांना डॉक्टरही आले-मीठाचे चाटण खायला सांगतात. डोकं, कपाळ दुखत असेल तर ते ही थांबतं. पित्ताचा त्रास होणार्यांनी आल्याचा रस सतत पित जा. पित्त आटोक्यात येईल. डोक्याला आल्याचा रस लावला जातो. त्यानेही सर्दीपासून आराम मिळतो. आल्यात इंजाइम असते. त्यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते.
आल्याचा चहा भारतात अनेक ठिकाणी प्यायला जातो. आपण चहात आलं किसून घालतो. आणि चहा पितो. पण आल्याचा चहा साध्या चहा पेक्षा वेगळा आणि जास्त पौष्टिक असतो. आल्याचे पाणी ही प्यायले जाते. आल्याचा किस मीठ घालून खाल्ला जातो. आलं वातावरती फार गुणकारी. तसेच आलं पित्तशामक आहे. त्यामुळे ते पित्त खेचून घेते. रोज जेवणात आलं वापरलं जाईल, याची काळजी घ्या. जेवण पचण्यासाठी ते गरजेचे आहे. पूर्वापार चालत आलेल्या आहारपद्धतीं मागे असणारी शास्त्रीय कारणे जाणून घेणे गरजेचे असते.