Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कलिंगडाच्या बिया कचरा समजून फेकू नका, बिया खाण्याचे फायदे वाचा- पुन्हा करणार नाही अशी चूक

कलिंगडाच्या बिया कचरा समजून फेकू नका, बिया खाण्याचे फायदे वाचा- पुन्हा करणार नाही अशी चूक

Watermelon Seeds Benefits : कलिंगडाच्या बियांनी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. चला जाणून घेऊ याचे फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 18:24 IST2026-03-17T15:01:52+5:302026-03-17T18:24:19+5:30

Watermelon Seeds Benefits : कलिंगडाच्या बियांनी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. चला जाणून घेऊ याचे फायदे...

Do you know the health benefits of eating roasted or raw watermelon seeds | कलिंगडाच्या बिया कचरा समजून फेकू नका, बिया खाण्याचे फायदे वाचा- पुन्हा करणार नाही अशी चूक

कलिंगडाच्या बिया कचरा समजून फेकू नका, बिया खाण्याचे फायदे वाचा- पुन्हा करणार नाही अशी चूक

Watermelon Seeds Benefits : उन्हाळ्यात लालेलाल आणि गारेगार कलिंगड खाण्याची मजा काही वेगळीच असते. कलिंगडाची गोड चव आणि रसाने भरलेला एक एक तुकडा तोंडात टाकताच एक वेगळाच आनंद मिळतो. या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड खाल्लं जातं. कारण यात भरपूर प्रमाणात पाणी असतं. कलिंगड खाण्यात मजा तर येतेच, सोबतच यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. आपण पाहतो की, साधारणपणे लोक कलिंगड खाताना त्यातील बिया फेकतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, या बियादेखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. कलिंगडाच्या बियांनी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. चला जाणून घेऊ याचे फायदे...

बियांमधील पोषक तत्त्वे 

कलिंगडाच्या बियांमध्ये एक दोन नाही तर अनेक पोषक तत्वे असतात. पहिली महत्वाची बाब म्हणजे या बियांमध्ये कॅलरी कमी असतात. तर प्रोटीन आणि व्हिटामिन्स भरपूर असतात. तसेच यात फॅटी अॅसिड, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि झिंकही भरपूर असतं.

कलिंगड बियांसोबत खाण्याचे फायदे

डायटिशिअन सांगतात की, कलिंगडाच्या बियांमध्ये मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असतं, जे लहान मुलांच्या हाडांना मजबूत करण्यास मदत करतं. तसेच या हेल्दी फॅटही असतं, जे त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतं. यात प्लांट बेस्ड प्रोटीनही भरपूर असतं आणि सोबतच पचन व मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास फायदेशीर ठरतं.

मुलांची उंची वाढण्यासाठी फायदेशीर

जर तुमच्या लहान मुलाची उंची वाढत नसेल किंवा त्यांचा विकास योग्य पद्धतीनं होत नसेल तर त्यांना कलिंगडाच्या बिया खायला द्यायला हव्यात. डायटिशिअन सांगतात की, कलिंगडामध्ये आढळणाऱ्या हेल्दी फॅटनं मेंदुचा विकास अधिक चांगला होतो. कलिंगडात सेलेनियम नावाचं तत्व असतं, जे मोठ्या लोकांमधील ब्लड प्रेशर कमी करतं आणि थायरॉइडमध्ये आराम देतं. 

कशा खायच्या बिया?

औषधी गुण असलेल्या कलिंगडाच्या बिया खाव्यात कशा असा प्रश्न अनेकांना पडतो. काही लोक कलिंगड खातानाच तशाच कच्च्या बिया खातात. पण कलिंगडाच्या बिया आपण सुविधा आणि इच्छेनुसार खाऊ शकता. त्यासोबतच या बिया कलिंगडासह तशाच कच्च्या खाऊ शकता. तसेच या बियांना अकुंरित करून किंवा भाजूनही खाऊ शकता. कशाप्रकारेही बिया आपल्यासाठी फायदेशीरच ठरतात. फक्त एक काळजी घ्यावी की, बिया खाताना बारीक चावून खाव्यात, तेव्हा त्या चांगल्या पचन होतील. 

Web Title : तरबूज के बीज को कचरा न समझें! फायदे जानकर, गलती कभी नहीं दोहराएंगे।

Web Summary : तरबूज के बीज प्रोटीन, विटामिन और खनिजों से भरपूर होते हैं। ये बच्चों में हड्डियों को मजबूत करते हैं, मेटाबॉलिज्म को बढ़ावा देते हैं और स्वस्थ त्वचा और बालों को बढ़ावा देते हैं। अधिकतम लाभ के लिए इन्हें कच्चा, अंकुरित या भूनकर खाया जा सकता है। बच्चों की ऊंचाई बढ़ाने में सहायक।

Web Title : Don't Discard Watermelon Seeds! Read Benefits, You'll Never Repeat Mistake.

Web Summary : Watermelon seeds are nutritious, packed with protein, vitamins, and minerals. They aid bone strength in children, boost metabolism, and promote healthy skin and hair. They can be consumed raw, sprouted, or roasted for maximum benefit. Good for height growth in kids.