Lokmat Sakhi >Food > मुलींनो, क्रेव्हिंग्ज होतात? मन मारू नका, ' हे ' खा, त्वचा छान राहील - वजनही वाढणार नाही

मुलींनो, क्रेव्हिंग्ज होतात? मन मारू नका, ' हे ' खा, त्वचा छान राहील - वजनही वाढणार नाही

do you have cravings? Don't worry, eat these .. : सतत भूक लागत असेल तर, काय खावे काय नाही जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2025 15:43 IST2025-02-11T13:22:48+5:302025-02-11T15:43:36+5:30

do you have cravings? Don't worry, eat these .. : सतत भूक लागत असेल तर, काय खावे काय नाही जाणून घ्या

do you have cravings? Don't worry, eat these .. | मुलींनो, क्रेव्हिंग्ज होतात? मन मारू नका, ' हे ' खा, त्वचा छान राहील - वजनही वाढणार नाही

मुलींनो, क्रेव्हिंग्ज होतात? मन मारू नका, ' हे ' खा, त्वचा छान राहील - वजनही वाढणार नाही

आवडीच्या गोष्टी सोडायला कोणालाच आवडत नाही. पण सुदृढ आरोग्यासाठी आवडत्या पदार्थांपासून दूर जावं लागतं. (Girls, do you have cravings? Don't worry, eat these ..)कारण काही अभ्यासांमधून हे सिद्ध झाले आहे की, भूक लागली म्हणजे शरीराला हेल्दी अन्न हवं असतं. मात्र सतत होणार्‍या क्रेव्हिंग्ज या जास्तकरून फॅट्सने भरलेल्या पदार्थांसाठीच असतात. म्हणून तर आपण मराठीत व्हिंग्जना अरबटचरबट खाण्याची इच्छा म्हणतो. अशा पदार्थांनी त्वचा खराब होते. शरीराला सगळ्या चवींची गरज असतेच.(Girls, do you have cravings? Don't worry, eat these ..) तुम्हाला खावासा वाटणारा पदार्थ जर अनहेल्दी असेल तर, त्यासाठी हेल्दी पर्याय शोधा. पाच पर्यायी पदार्थ तर येथेच नमूद आहेत.

१. सतत काही ना काही चघळायची अनेकांना सवय असते. काम करताना, मोबाइल बघताना, वाचताना, प्रवासात सतत खात असतात. मुळात ही सवय चांगली नाही. पण काहींना क्रेव्हिंग्ज सहन करता येत नाहीत. मग ते वेफर्स, चॉकलेट, आदी फॅकेट फूड खातात. त्याऐवजी सुकामेवा खा. थोड्याशा दाण्यांमध्ये पोट भरून जाईल. मखाना, चुरमुरे असे पदार्थ खा.

२. रिफाइंड कार्बोदके असलेले पदार्थ वापरण्यापेक्षा, कॉम्पलेक्स कार्बोदके असलेले पदार्थ वापरा. जसे की मैद्याच्या ऐवजी तांदळाचं पीठ, कणीक, ज्वारी, बाजरी असे पदार्थ वापरा. मैद्यासारखे पदार्थ टाळा. त्वचाही चांगली राहील.

३. क्रेव्हिंग्ज सर्वात जास्त गोड पदार्थ खाण्यासाठी होतात. महिलांना तर गोड खाण्याची तीव्र इच्छा अधूनमधून होतच असते. मग आपण केक, चॉकलेट असे डेझर्टचे पदार्थ खातो. त्यात प्रचंड साखर आणि फक्त फॅट्स असतात. त्यामुळे काही गोड खावसं वाटल्यावर फळे खा. वेगवेगळ्या बेरीज खा. त्यात गोडवा असतो. शरीरासाठी फळे फार महत्त्वाची ठरतात.

४. उन्हाळ्यात किंवा इतरही दुपारच्या वेळी गार पेय पिण्याची उक्ती येते. घशाला पडलेली कोरड साध्या पाण्याने जात नाही. मग आपण सोडायुक्त गार पदार्थ पितो. ज्यात फक्त साखरेचे पाणी असते. वजन एकदम झपाट्याने वाढतं. त्यामुळे गार प्यायची इच्छा झाल्यावर वाळ्याचे सरबत, लिंबू पाणी, नारळ पाणी इतर सरबत घरीच तयार करून प्या. नारळ पाणी सगळ्यात मस्त पर्यायी पेय आहे.

५. चहा किंवा कॉफी प्यायची शरीराला लावलेली सवय मोडा. सकाळी तसेच संध्याकाळी चहा हवाच हा हट्ट सोडा. साखरेने भरलेला चहा पिण्याऐवजी हर्बल चहा प्या. खोकला, सर्दी सुद्धा होणार नाही. चहाची चटकही भागेल. वजनही वाढणार नाही. त्वचेसाठीही असे चहा फार चांगले असतात.

Web Title: do you have cravings? Don't worry, eat these ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.