काही जणांचे पित्त कायम खवळलेलेच असते. सारख्या उलट्या होतात. अपचन होते. कितीही उपाय करा डॉक्टरांकडे जा पित्ताचा त्रास बंद होत नाही. (Do you constantly have problems of acidity? A very simple solution is to drink a glass of this fennel syrup every day)पित्त झाले की अस्वस्थ व्हायला होते. पित्ताचा त्रास उन्हाळ्यात जास्त होतो मात्र पित्तप्रवृत्ती असलेल्या लोकांना बाराही महिने पित्तामुळे जळजळत राहते तसेच मळमळते. इतरही काही त्रास होतात. यावर अगदी मस्त आणि चविष्ट उपाय म्हणजे बडीशेपेचे सरबत.
पित्तामुळे सारखे फोड येतात. सगळ्यात जास्त त्रास देणारे फोड म्हणजे तोंडात येणारे फोड. ज्याला आपण तोंड येणे असे म्हणतो. (Do you constantly have problems of acidity? A very simple solution is to drink a glass of this fennel syrup every day)माऊथ अल्सरचा त्रास अनेकांना होतो. जिभेवरही फोड येतात. त्यामुळे साधे पाणी पितानाही चरचरते. या सगळ्या त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात हे सरबत घ्यायला सुरवात करा. चवीलाही छान असते.
बडीशेप मुळात थंड असते. त्याचबरोबर पचनाला मदत करते. पोट बिनसले की पित्त वाढते त्यामुळे पोटाला कायम थंड ठेवायचे. त्यासाठी विविध उपाय करत राहायचे. त्यापैकीच एक उपाय म्हणजे बडीशेपेचे सरबत. करायला अगदी सोपे आहे पाहा काय करायचे.
साहित्य बडीशेप, खडी साखर, सैंधव मीठ
कृती१. बडीशेप छान परतायची. मस्त खमंग वास सुटेपर्यंत परतून घ्यायची. परतून झाल्यावर त्यात खडीसाखर घालायची. बडीशेप जेवढी घ्याल त्याच्या बरोबर अर्धी खडीसाखर घ्यायची. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त साखर घेऊ शकता.
२. एका मिक्सरच्या भांड्यात परतलेली बडीशेप घ्यायची. त्यात खडीसाखर घालायची. चमचाभर सैंधव मीठ घालायचे. मिश्रण छान वाटून घ्यायचे. मस्त बारीक अशी पूड करुन घ्यायची. एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. खसखस घालू शकता चवीला छान लागते.
३. सरबत पिताना गार पाण्यात चमचाभर तयार केलेली पूड घालायची. त्यात थोडा लिंबाचा रस पिळायचा. तसेच सब्जा घालायचा. पोटासाठी आणखी चांगला. तुळशीचे बी शरीराला गारवा देते तसेच इतरही अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. लिंबाचा रस पिळल्याने सरबताची चव आणि पोषण दोन्ही वाढते. साखर वापरणे टाळा खडीसाखर वापरा.