Lokmat Sakhi >Food > कडीपत्ता फक्त फोडणीतच घालता? पाहा काय कमाल चवीला मुकताय .. कडीपत्याची चटणी म्हणजे आहाहाहा!!!

कडीपत्ता फक्त फोडणीतच घालता? पाहा काय कमाल चवीला मुकताय .. कडीपत्याची चटणी म्हणजे आहाहाहा!!!

Do you add curry leaves only in tadka? then try this Curry leaf chutney : ताटामध्ये काही तरी चमचमीत पदार्थ असला की जेवणाची मज्जा वाढते. पाहा कडीपत्याची चटणी कशी कराल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2025 14:50 IST2025-04-20T14:49:35+5:302025-04-20T14:50:32+5:30

Do you add curry leaves only in tadka? then try this Curry leaf chutney : ताटामध्ये काही तरी चमचमीत पदार्थ असला की जेवणाची मज्जा वाढते. पाहा कडीपत्याची चटणी कशी कराल.

Do you add curry leaves only in tadka? then try this Curry leaf chutney | कडीपत्ता फक्त फोडणीतच घालता? पाहा काय कमाल चवीला मुकताय .. कडीपत्याची चटणी म्हणजे आहाहाहा!!!

कडीपत्ता फक्त फोडणीतच घालता? पाहा काय कमाल चवीला मुकताय .. कडीपत्याची चटणी म्हणजे आहाहाहा!!!

अनेक प्रकारच्या चटण्या आपण खातो. प्रत्येक चटणी चवीला अगदी वेगळी असते. पण चवीला सगळ्याच मस्त लागतात. चटणी हे फार लोकप्रिय तोंडीलावणे आहे. (Do you add curry leaves only in tadka?  then try this Curry leaf chutney)एखादं दिवस भाजी नसली तरी चटणी पोळी आपण अगदी आवडीने खातो. काही जणांना तर चटणी भात हे कॉम्बिनेशनही आवडतं.  कडीपत्याची चटणी कधी खाल्ली आहे का? एकदा या पद्धतीने करा आणि खाऊन बघा. नक्कीच आवडेल. (Do you add curry leaves only in tadka?  then try this Curry leaf chutney)तसेच दोन महिने हमखास टिकते. फ्रिजमध्ये साठवून ठेवायची. 

साहित्य
कडीपत्ता, तेल, पाणी, उडदाची डाळ, शेंगदाणे, चणाडाळ, सुकं खोबरं, जिरे, लसूण, मीठ  

कृती
१. छान ताजा कडीपत्ता घ्या. गडद हिरव्या रंगाची पाने निवडून घ्या. त्यांची चव फार छान लागते. एका स्वच्छ फडक्याने कडीपत्ता व्यवस्थित पुसून घ्या. नंतर एका कढईमध्ये कडीपत्ता परतून घ्यायचा. आधी कढई गरम करुन घ्या. कढई जरा गरम झाली की त्यामध्ये कडीपत्ता घालायचा. तेल अजिबात वापरायचे नाही. कडीपत्ता मस्त कुरकुरीत करुन घ्यायचा. कडीपत्याच्या सुकलेल्या पानांचा आवाज यायला लागला की गॅस बंद करा. 

२. कढईमधून कडीपत्ता काढून घ्या. मग कढईमध्ये चमचाभर तेल घाला. तेलावर उडदाची डाळ छान परतून घ्या. रंग पिवळसर होईपर्यंत परता. डाळ मस्त कडक व कुरकुरीत होईल. मग ती डाळ एका वाटीमध्ये काढून घ्या. 

३. त्याच कढईमध्ये पुन्हा एक चमचा तेल घाला. त्यावर शेंगदाणे परतून घ्या. शेंगदाणे पटकन परतले जातात. शेंगदाणे काढून घ्या. नंतर चमचाभर तेलावर चणा डाळ परता. चणा डाळ छान परतायला जरा वेळ लागतो. सगळे पदार्थ वेगळे परता. असे केल्याने सगळे पदार्थ योग्य प्रमाणात परतले जातात. काही करपत नाही तसेच काही कच्चेही राहत नाही.

४. लसणाच्या काही पाकळ्या तेलावर परतून घ्या. त्यामध्ये सुके खोबरे घाला. ते ही छान तांबूस होईपर्यंत परता. त्यामध्ये जिरे घाला. ते ही मस्त खमंग परता. सगळे पदार्थ परतून झाल्यावर त्या कढईमध्ये परतलेले सारे एकजीव करा. ते मिश्रण अगदी मिनिटभर एकत्र परता आणि मग पसरट ताटलीमध्ये काढून गार करत ठेवा. 

५. मिश्रण गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओता. मस्त वाटन घ्या. लगदा होणार नाही याची काळजी घ्या. जरा जाडसरच वाटा. 

Web Title: Do you add curry leaves only in tadka? then try this Curry leaf chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.