Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > Diwali Special : फक्त ३० मिनिटांत करा हा कुरकुऱ्यांचा लसूण चिवडा, दिवाळीत एवढा खमंग पदार्थ तुम्ही खाल्लेलाच नसेल

Diwali Special : फक्त ३० मिनिटांत करा हा कुरकुऱ्यांचा लसूण चिवडा, दिवाळीत एवढा खमंग पदार्थ तुम्ही खाल्लेलाच नसेल

Diwali Special: Make this crispy garlic chivda in just 30 minutes, make thi delicious recipe : कुरमुऱ्याचा चिवडा करा घरीच. सोपी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2025 14:28 IST2025-10-08T14:24:42+5:302025-10-08T14:28:12+5:30

Diwali Special: Make this crispy garlic chivda in just 30 minutes, make thi delicious recipe : कुरमुऱ्याचा चिवडा करा घरीच. सोपी रेसिपी.

Diwali Special: Make this crispy garlic chivda in just 30 minutes, make thi delicious recipe | Diwali Special : फक्त ३० मिनिटांत करा हा कुरकुऱ्यांचा लसूण चिवडा, दिवाळीत एवढा खमंग पदार्थ तुम्ही खाल्लेलाच नसेल

Diwali Special : फक्त ३० मिनिटांत करा हा कुरकुऱ्यांचा लसूण चिवडा, दिवाळीत एवढा खमंग पदार्थ तुम्ही खाल्लेलाच नसेल

कुरमुरे पचायला हलके असतात तसेच त्यामुळे पित्त किंवा इतर कोणते त्रास होत नाहीत. विविध प्रकारचा चिवडा केला जातो. त्यापैकीच एस प्रकार म्हणजे कुरमुऱ्यांचा लसूण चिवडा. (Diwali Special: Make this crispy garlic chivda in just 30 minutes, make thi delicious recipe )भरपूरशी लसूण घालून हा मस्त चिवडा करा. अगदी सोपी रेसिपी आहे. पण चवीला जामच भारी. करायला जास्त वेळ लागत नाही. १५ ते २० दिवस छान कुरकुरीत राहतो. त्यामुळे नक्की करुन पाहा. 

साहित्य 
कुरमुरे, लसूण, कडीपत्ता, तेल, मोहरी, हिंग, हिरवी मिरची, मीठ, हळद, लाल तिखट, शेंगदाणे, शेव, डाळं, आमचूर पूड, साखर

कृती
१. एका पॅनमध्ये कुरमुरे घ्या आणि भाजून घ्या. परतू नका सुकेच भाजा. छान कुरकुरीत करायचे. भाजलेले कुरमुरे एका परातीत घ्यायचे. आणि त्यावर कागद ठेवायचा. 

२. एका कढईत तेल गरम करायचे. त्यात शेंगदाणे परतून घ्यायचे. मस्त खमंग परतायचे. मग दाणे काढून भरपूर कडीपत्ता परतायचा. कडीपत्ता या चिवड्याची चव वाढवतो आणि सुगंधही देतो. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. ते तुकडेही परतून घ्यायचे. तसेच डाळं घ्या आणि ते ही परतायचे. लसूण सालांसकट घेतली तरी चालेल. सालं काढली तरी चालेल. लसूण ठेचायची आणि मग परतातयची. खमंग लालसर परतायची. 

३. सगळे परतलेले पदार्थ कुरमुऱ्यांमध्ये घालून मिक्स करायचे. व्यवस्थित ढवळून घ्यायचे. कढईत मोहरी घालायची आणि परतून घ्यायची. मग त्यात हिंग घालायचे. गॅस बंद करायचा आणि हळद घालायची, लाल तिखट घालायचे आणि त्यात आमचूप पूडही घालायची. तसेच थोडी साखर घालायची आणि मसाला छान ढवळून घ्यायचा. आणि मग मिश्रणात ओतायचा. 

४. त्यात शेव घालायची. मीठ घालायचे. हाताने चिवडा मस्त मिक्स करायचा. झाऱ्याचा वापर केला तरी चालेल. छान पिवळा रंग येतो. मग तो चिवडा हवाबंद डब्यात काढून घ्यायचा. महिनाभर आरामात टिकतो.   

Web Title : दिवाली स्पेशल: 30 मिनट में बनाएं कुरकुरा लहसुन चिवड़ा

Web Summary : सिर्फ 30 मिनट में स्वादिष्ट और कुरकुरा लहसुन चिवड़ा बनाएं! यह आसान रेसिपी मुरमुरे, मूंगफली और मसालों का उपयोग करके एक स्वादिष्ट नाश्ता बनाती है जो हफ्तों तक ताजा रहता है। दिवाली के लिए बिल्कुल सही!

Web Title : Diwali Special: Quick & Crispy Garlic Chivda Recipe in 30 Minutes

Web Summary : Make delicious, crispy garlic chivda in just 30 minutes! This easy recipe uses puffed rice, peanuts, and spices for a flavorful snack that stays fresh for weeks. Perfect for Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.