Join us  

How to make Crispy chakli : चकल्या जास्त कडक तर कधी नरम पडतात? कुरकुरीत, खमंग चकल्यासाठी 'या' घ्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 3:14 PM

Diwali Special How to make Crispy chakli : जर तुम्ही साच्यामध्ये चकली बनवत असाल आणि ती गोल न बनता सारखी सारखी तुटत असेल तर याचा अर्थ चकलीच्या पिठात पाणी झालंय.

दिवाळीचा (Diwali 2021)  सण सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. घरोघरी साफसफाई आणि फराळाची (Diwali Faral) लगबग सुरू आहे. लाडू, चिवडा, करंजी, चकल्या बनवायच्या म्हटलं की आठवडाभर आधीच तयारी करावी लागते. कधी कधी व्यवस्थित साहित्य घालूनही पदार्थ बिघडतात. 

खासकरून चकल्या बनवताना दमछाक होते. व्यवस्थित आकारात चकल्या तयार करून तळाव्या लागतात. कधी तेलात घातल्यावर त्याचे तुकडे तुकडे वेगळे होतात. तर कधी नरम होतात. चकली बनवण्याची योग्य पद्धत आणि काही ट्रिक्स माहीत असल्या तर त्या बिघडत नाही.  (Diwali chakli recipe in marathi)

चांगल्या  कुरकुरीत चकल्यांसाठी या टिप्स लक्षात ठेवा (Tips For perfect, crispy chakali)

१) चकलीसाठी लागणारं पीठ थोडे वाफवून घेतले की चकली जास्त कुरकुरीत होतात. 

२) जर तुम्ही साच्यामध्ये चकली बनवत असाल आणि ती गोल न बनता सारखी सारखी तुटत असेल तर याचा अर्थ चकलीच्या पिठात पाणी झालंय. अशावेळी पिठात थोडं पाणी आणि तेल घालून व्यवस्थित मळून घ्या. 

३) चकल्या तळताना तेल पूर्णपणे गरम होऊ द्या. चकल्या तेलात सोडताना आच मोठी असू द्या. साधारण १ मिनिटानंतर गॅस पूर्णपणे कमी करायचा आहे आणि लालसर होईपर्यंत तळायचं आहे.

४) चकली कुरकुरीत होण्यासाठी पिठात गरम करून तेल /मोहन टाकावं. पिठात मोहन जास्त झाले तर - थोडी भाजणीची उकड काढावी (तेल न घालता), आधी मळलेल्या पिठाचा थोडा भाग घेऊन त्यात मिक्स करावे आणि त्याच्या चकल्या करून पाहाव्यात.

५) चकली भाजणीची उकड गार पाण्याने मळल्यास  चकली बिघडू शकते. भाजणीची उकड मळताना नेहमी गरम किंवा कोमट पाण्याने मळावी.

चकली रेसेपीज (How to make chakli at home easily and quickly)

१)

२)

३)

४)

५)

टॅग्स :अन्नदिवाळी 2021पाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.