दिवाळीच्या (Diwali 2025) दिवसांत प्रत्येकाच्याच घरी लाडू केले जातात. कोणी रव्याचे लाडू करतं तर कोणी बेसनाचे लाडू. तर काहीजण दोन्ही प्रकारचे लाडू करतात. रव्याचा लाडू अनेकांना परफेक्ट जमत नाहीत. कधी रव्याचा लाडू जास्त कडक होतो, तर कधी कमी गोड होतो. रव्याचा लाडू करण्यासाठी काही खास टिप्स पाहूया. जेणेकरून या दिवाळीत परफेक्ट लाडू बनतील. (How To Make Rava ladoo For Diwali)
रव्याचे लाडू परफेक्ट होण्यासाठी काय करायचं? (Rava Ladoo Making Tips)
1) रवा मंद आचेवर कमीत कमी 10 ते 15 मिनिटं भाजणं अत्यंत महत्वाचं आहे.
2) रवा पांढराच राहिला पाहीजे पण त्याचा कच्चा वास पूर्ण निघून जाईल असं पाहा.
3) रवा भाजताना पुरेसं गरम केलेलं तूप वापरा जेणेकरून रवा एकसारखा भाजला जाईल.
4) रवा भाजण्याचा उद्देश त्याचा कच्चा वास घालवणं हा आहे. त्याचा रंग बदलणं नाही. रवा पांढराच राहायला हवा पण त्याला खमंग वास यायला हवा.
5) लाडू बिघडण्याची शक्यता कमी करण्यासाठी पिठीसाखर वापरणं उत्तम आहे.
5) साखरेचा पाक बिघडल्यास लाडू एकतर खूप कडक होतात किंवा विरघळतात.
6) जर तुम्ही पाक वापरत असाल तर एकतारी पाक होणं महत्वाचं आहे. पाक थोडा जास्त शिजला तरी लाडू कडक होतात पाक कमी शिजल्यास लाडू विरघळतात.
7) लाडूचे मिश्रण गरम असतानाच लाडू वळा. मिश्रण थंड झाल्यास त्यात असलेलं तूप गोठतं आणि लाडू वळताच येत नाही. लाडू वळताना हातानं व्यवस्थित दाब देऊन मग लाडू करा.
8) लाडू करताना मिश्रण खूप कोरडे वाटल्यास गरम केलेले दूध आणि तूप अगदी चमचाभर किंवा आवश्यकतेनुसार वापरा. लाडू वळल्यानंतर त्यांना पूर्णपणे थंड होऊ द्या.
9) लाडू गरम असताना डब्यात ठेवल्यास वाफेमुळे लवकर खराब होतात. थंड झालेले लाडू हवाबंद डब्यात भरून ठेवा. ओलावा किंवा हवा लागल्यास लाडू मऊ पडतात.
10) लाडूचा डबा नेहमी कोरड्या आणि थंड ठिकाणी ठेवा.