Join us

थंडीच्या दिवसात रोज खा बाजरीची एक भाकरी, मिळतील इतके फायदे की विचारही केला नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:12 IST

Bajra Flour Benefits In Winter : आपण जर हिवाळ्यात नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला जाणून घेऊ याचे फायदे...

Bajra Flour Benefits In Winter : हिवाळ्यात वेगवेगळ्या पौष्टिक गोष्टी खाल्ल्या जातात. वेगवेगळी कडधान्यही खाल्ली जातात. आपली भूकही या दिवसात अधिक वाढते. पण या दिवसांमध्ये सर्दी-खोकलाही होतो. सोबतच आपली इम्यूनिटी कमी होत असल्याने काही समस्या होतात. तसेच आपलं पचन तंत्रही योग्यपणे काम करत नाही. अशात आम्ही या समस्या दूर करण्यासाठी एक उपाय सांगणार आहोत. आपण जर हिवाळ्यात नियमितपणे बाजरीची भाकरी खाल्ली तर अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला जाणून घेऊ याचे फायदे...

बाजरीमधील पोषक तत्व

बाजरीचा समावेश हेल्दी धान्यात केला जातो. यात आढळणारे पोषक तत्व शरीरासाठी फायदेशीर असतात. खासकरून हिवाळ्यात बाजरी खाणं अधिक फायदेशीर मानलं जतं. कारण बाजरी उष्ण असते. यात भरपूर फायबर, व्हिटामिन बी 3, आयर्न, झिंक आणि प्रोटीनचं प्रमाण असतं. रोज बाजरी खाल्ल्यास केल्यास वजन कमी करण्यास, ब्लड शुगर कंट्रोल करण्यास आणि यूरिक अॅसिड कंट्रोल करण्यास मदत मिळते.

यूरिक अ‍ॅसिड होईल कमी

शरीरात यूरिक अ‍ॅसिडची लेव्हल वाढली असेल तर बाजरीची भाकरी खाणं खूप फायदेशीर मानलं जातं. बाजरी यूरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी फायदेशीर मानली जाते. बाजरीमध्ये प्यूरिन नावाचं तत्व कमी असतं आणि फायबर अधिक असतं. अशात बाजरी यूरिक अ‍ॅसिड शरीरातून काढण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

पचनक्रिया सुधारते

जर तुम्ही हिवाळ्यात नियमितपणे बाजरीच्या भाकरीचं सेवन केलं तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात. बाजरीच्या भाकरीने पचनक्रियेत खूप सुधारणा होते. त्याशिवाय अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटदुखीसारख्या समस्याही दूर होतात

इम्यूनिटी वाढते

जर तुम्हाला बाजरीची भाकरी आवडत नसेल तर किंवा त्याची टेस्ट आवडत नसेल तर भाकरी करताना त्यात हींग, लसूण आणि काळं मीठ टाका. याने भाकरीची टेस्ट वाढेल आणि लसणातील पोषख तत्वांनी इम्यूनिटीही बूस्ट होईल.

आयर्न मिळतं

बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं. आयर्नची कमतरता असणाऱ्या लोकांसाठी बाजरीची भाकरी रामबाण उपाय मानला जाते. याने एनीमियाचा धोकाही कमी होतो.

हृदयासाठी फायदेशीर

हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, बाजरीची भाकरी हृदयाच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. याने नसांमधील ब्लॉकेज कमी होतात आणि त्यामुळे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होतं. तुम्हाला हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी राहतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Eat Bajra Roti Daily in Winter: Unexpected Health Benefits!

Web Summary : Bajra roti is a winter superfood. Rich in fiber, iron and vitamins, it aids digestion, boosts immunity, controls blood sugar, and reduces uric acid. It also benefits the heart and prevents anemia.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सथंडीत त्वचेची काळजी