Uses of almond peel : तसे तर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी भिजवलेले बदाम भरपूर लोक खातात. पण हिवाळा आला की, जरा याचं प्रमाण अधिक वाढतं. सामान्यपणे बदाम खाल्ल्यानंतर त्यांची साल जास्तीत जास्त लोक फेकतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, बदामाच्या सालीमध्येही अनेक पोषक तत्व असतात. यात सालीमध्ये व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात. अशात आज आम्ही तुम्हाला बदामाच्या सालीचा वापर कसा करू शकाल हे सांगणार आहोत.
पोट साफ होईल
बदामाच्या सालीमध्ये भरपूर फायबर असतं. जे आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढवतात आणि यात फ्लेवोनोइड्स असतात. बदामाच्या सालीचं तुम्ही अळशी, खरबूजाच्या बिया आणि मिश्रीसोबत मिक्स करून दुधासोबत सेवन करू शकता. याने पोट साफ होण्यास मदत मिळेल.
हेअरमास्क बनवा
बदामाच्या सालीचा हेअरमास्क तयार करण्यासाठी अर्धा कप बदामाची साल, १ अंड, १ मोठा चमचा खोबऱ्याचं तेल, २ मोठे चमचे एलो जेल आणि मध मिक्स करा. हे मिश्रण चाळणीने गाळून केसांवर लावा. यात व्हिटामिन ई भरपूर असतं. जे केसांना पोषण देतं.
स्नॅक्स म्हणून खा
१ कप बदामाची साल घ्या, ती चांगली धुवा आणि उन्हात वाळत घाला. यानंतर एक बाउल घ्या त्यात एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल, एक चमचा लसूण पावडर, एक चमचा कांद्याची पावडर, टेस्टनुसार मीठ आणि काळी मिरी पूड घाला. या गोष्टी चांगल्या मिक्स करा आणि मग यात वाळलेली बदामाची साल घाला. आता हे १० ते १५ मिनिटे बेक करा. हे मिश्रण कुरकुरीत झाल्यावर एका डब्यात स्टोर करा. हे तुम्ही कधीही खाऊ शकता.
