Black Garlic Benefits: आपण पाहतो की, आपल्याकडे जवळपास सगळ्याच भाज्यांमध्ये लसूण घातला जातो. याने भाजी, पदार्थांची चव तर वाढतेच सोबतच यातील यातून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. सामान्यपणे जास्तीत जास्त घरांमध्ये पांढरा लसूणच वापरला जातो. पण बाजारात काळा लसूणही मिळतो. काही भागांमध्ये हाच लसूण वापरला जातो. अशात आपल्या मनात प्रश्न येऊच शकतो की, पांढऱ्या आणि काळ्या लसणामध्ये काय फरक असतो? किंवा कोणता लसूण अधिक फायदेशीर असतो? किंवा काळा लसूण कसा तयार होतो? वगैरे वगैरे. हेच आज आपण समजून घेणार आहोत.
मुळात आपण जो पांढरा लसूण वापरतो त्याला काही आठवडे एका नियंत्रित तापमानात ठेवलं जातं. यादरम्यान त्यात रासायनिक बदल होतात. ज्यामुळे पांढरा लसूण काळा होतो. काळ्या लसणात तिखटपणा कमी असतो. चव हलकी आणि जरा गोड लागते.
पांढऱ्या आणि काळ्या लसणात फरक?
हेल्थ एक्सपर्टनुसार, सामान्य लसणामध्ये एलिसिन नावाचा पदार्थ अधिक प्रमाणात असतो. या पदार्थामुळे यात तिखट गंध आणि बॅक्टेरिया नष्ट करण्याचे गुण असतात. काही लोकांना याने पचनासंबंधी त्रास होऊ शकतो, पण काळ्या लसणामधील एलिसिन एका स्थिर अॅंटी-ऑक्सिडेंटमध्ये बदलतं. खासकरून एस-एलिल सिस्टीन नावाचा पदार्थ शरीरात सहजपणे अॅब्जॉर्ब होतो. त्यामुळे अॅंटी-ऑक्सिडेंट फायद्यांसाठी काळा लसूण चांगला पर्याय मानला जातो.
काळ्या लसणाचे फायदे
काळ्या लसणामध्ये शरीरातील सूज कमी करणारे गुण असतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास फायदेशीर असतात. तसेच हा लसूण हृदय ठणठणीत ठेवण्यासाठी सुद्धा फायदेशीर असतो. तसेच यात असेही काही गुण असतात, जे प्रदूषणाचा प्रभाव काही प्रमाणात कमी करण्यास मदत करतात. रोज एक किंवा दोन कळ्या खाल्ल्यास चांगले परिणाम दिसू शकतात. हा लसूण थेट खाता येतो किंवा भाज्यांमध्येही वापरू शकता.
७ दिवस उपाशीपोटी लसूण खाण्याचे फायदे
लसूण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. जर रोज ७ दिवस उपाशीपोटी आपण लसूण खाल्ला तर इम्यूनिटी वाढते, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, ब्लड शुगर कंट्रोल राहते, पचन सुधारतं आणि शरीर डिटॉक्स होण्यासही मदत मिळते.
