Join us

कांदा आरोग्यासाठी चांगला पण कांदा खाण्याची योग्य पद्धतही महत्वाची, कच्चा कांदा खात असाल तर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:47 IST

Health Tips : कांद्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण जर कांदा चुकीच्या पद्धतीनं खाल तर हाडांचं नुकसान होऊ शकतं. 

Health Tips : भाज्या असो वा वेगवेगळे पदार्थ असो त्यांची टेस्ट वाढवण्यासाठी कांदा महत्वाचा ठरतो. कांदा एक हेल्दी फूड आहे ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. तसेच कांद्यात हृदय निरोगी ठेवण्याची सुद्धा क्षमता असते. कांद्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण जर कांदा चुकीच्या पद्धतीनं खाल तर तुमच्या हाडांचं नुकसान होऊ शकतं. 

कसा खाल कांदा?

डायटिशिअन भावेश गुप्ता म्हणाले की, जर तुम्ही कांदा सलादसारखा खात असाल तर आजच बंद करा. कांद्यामध्ये भरपूर अ‍ॅंटी-न्य़ूट्रिएंट असतात. फ्लेवेनॉइड्स, टॅनिन, अल्कालॉइड्स आणि सायनोजेनिक ग्लायकोसाइड यात मुख्य आहेत. हे तत्व महत्वाच्या मिनरल्सच्या शोषणात अडथळा निर्माण करतात. जसे की, कॅल्शिअम, फॉस्फोरस, झिंक, मॅग्नेशिअम, आयर्न इत्यादी. कॅल्शिअम, फॉस्फोरस कमी झाल्यावर हाडं कमजोर होतात. सायनोजेनिक ग्लायकोसाइडचं अधिक प्रमाम सायनाइड पॉयजनिंग करू शकतं.

गॅस-ब्लोटिंग

कांदा हाय फोडमॅपमध्ये येतो. त्यामुळे आयबीएस आणि आयबीडीच्या रूग्णांना कांदा खाण्यास मनाई केली जाते. हाय फोडमॅप आणि अ‍ॅंटी-न्यूट्रिएंट झाल्यानं बऱ्याच लोकांना कांदा खाल्ल्यानंतर गॅस, ब्लोटिंग आणि हार्य बर्न यासारख्या पोटासंबंधी समस्या होतात.

इन्फेक्शनचा धोका

कांदा मातीमध्ये उगवतो. त्यामुळे कांद्यात पॅरासिटिक टेपवॉर्म जसे की, पॅथोजेनिक माइक्रोऑर्गेनिज्म होण्याचा धोकाही असतो. यानं मेंदुत सिस्टिकसर्कोसिससारखं इन्फेक्शन होण्याचा धोकाही असतो.

कांदा खाण्याची योग्य पद्धत

कांदा कधीही फोडणी देऊनच खावा. असं केल्यानं यातील पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गेनिज्म आणि इतर घातक तत्व उष्णतेमुळे नष्ट होतात.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स