Lokmat Sakhi >Food > घरात दही - बेकिंग सोडा नाही? कपभर बेसनाचा करा स्पॉन्जी जाळीदार ढोकळा; १५ मिनिटात ढोकळा रेडी

घरात दही - बेकिंग सोडा नाही? कपभर बेसनाचा करा स्पॉन्जी जाळीदार ढोकळा; १५ मिनिटात ढोकळा रेडी

Dhokla Without Curd - Health Fitness Food : बिना दह्याचा जाळीदार इन्स्टंट ढोकळा कसा तयार करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2024 02:30 PM2024-06-23T14:30:46+5:302024-06-23T14:31:43+5:30

Dhokla Without Curd - Health Fitness Food : बिना दह्याचा जाळीदार इन्स्टंट ढोकळा कसा तयार करायचा?

Dhokla Without Curd - Health Fitness Food | घरात दही - बेकिंग सोडा नाही? कपभर बेसनाचा करा स्पॉन्जी जाळीदार ढोकळा; १५ मिनिटात ढोकळा रेडी

घरात दही - बेकिंग सोडा नाही? कपभर बेसनाचा करा स्पॉन्जी जाळीदार ढोकळा; १५ मिनिटात ढोकळा रेडी

गुजराथचे अनेक पदार्थ लोकप्रिय आहेत. खमण ढोकळा, फाफडा, जिलेबी, खांडवी यासह इतर पदार्थ नाश्त्याला आवर्जून खाल्ले जातात (Dhokla Recipe). ज्यात खमण ढोकळा नाश्त्याला आवडीने खाल्ला जातो. ढोकळा हा एक उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे. पण घरी विकतसारखा ढोकळा तयार होत नाही (Food). ढोकळा कधी फसतो, तर कधी व्यवस्थित तयार होत नाही. चिकट तयार होतो (Cooking Tips).

जर आपल्याला विकतसारखा स्पॉन्जी आणि मऊ ढोकळा करायचा असेल तर, या पद्धतीने ढोकळा करून पाहा (Dhokla Recipe). या पद्धतीने ढोकळा तयार केल्यास परफेक्ट ढोकळा तयार होईल. जर आपल्याला दही आवडत नसेल किंवा, घरात दही उपलब्ध नसेल तर, बिना दह्याचा देखील ढोकळा परफेक्ट तयार होईल. बिना दह्याचा ढोकळा कसा करायचा पाहूयात(Dhokla Without Curd - Health Fitness Food).

बिना दह्याचा ढोकळा कसा करायचा?

लागणारं साहित्य

बेसन

साखर

मीठ

चिलटं, डास-झुरळांनी उच्छाद मांडलाय? बेकिंग सोड्याचा 'करा' जबरदस्त उपाय; किडे होतील गायब

हळद

तेल

लिंबाचा रस

पाणी

जिरं

मोहरी

कडीपत्ता

हिरवी मिरची

कृती

एका बाऊलमध्ये एक मोठा कप बेसन घ्या. त्यात २ चमचे साखर, अर्धा चमचा मीठ आणि चिमुटभर हळद घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात ४ चमचे तेल, एक चमचा लिंबाचा रस आणि गरजेनुसार पाणी घालून गुळगुळीत बॅटर तयार करा. तयार बॅटरवर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा.

डाळ शिजत घालण्यापूर्वी तुम्हीही 'ही' चूक करता का? डाळ भिजत घालायला विसरता का? डाळ शिजत घालण्यापूर्वी...

एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर एक स्टॅण्ड ठेवा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. एका डब्याला हाताने किंवा ब्रशने तेल लावा. ५ मिनिटानंतर बॅटरमध्ये एक चमचा बेकिंग सोडा किंवा इनो घाला. त्यावर २ चमचे पाणी घालून मिक्स करा. त्यात बॅटर भांड्यात ओतून पसरवा, आणि भांडं कढईतील स्टॅण्डवर ठेवा. त्यावर झाकण ठेवा.

२० मिनिटांसाठी ढोकळा वाफेवर शिजत ठेवा. २० मिनिटानंतर ढोकळा वाफेवर शिजला आहे की नाही, हे चेक करा. ढोकळा शिजला असेल तर, बाजूला काढून ठेवा. दुसरीकडे फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिरवी मिरची, साखर, मीठ आणि पाणी घालून मिक्स करा. फोडणी तयार झाल्यानंतर ढोकळ्यावर ओतून पसरवा. अशा प्रकारे स्पॉन्जी ढोकळा खाण्यासाठी रेडी.

Web Title: Dhokla Without Curd - Health Fitness Food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.