पनीर हा अनेक लाेकांचा आवडीचा पदार्थ. लहान मुलांनाही पनीर खूप आवडतं. जेवणात जर पनीरची भाजी असेल तर मुलं हमखास एखादी पोळी जास्तच खातात आणि अगदी व्यवस्थित जेवतात. पनीर मसाला, पनीर बटर मसाला, पालक पनीर अशा आपण पनीरच्या भाज्या करतोच. पण आता हरभरा पनीर ही रेसिपी ट्राय करून पाहा. ही भाजी हिरव्या मसाल्यामध्ये केली जाते आणि दिसायला ती पालक पनीरसारखीच दिसते. पण चवीला मात्र खूप वेगळी आहे. त्यामुळे एकदा ही भाजी ट्राय करून पाहायलाच हवी.(dhaba style harabhara paneer recipe)
ढाबास्टाईल पनीर हराभरा करण्याची रेसिपी
साहित्य
मोठी वाटी भरून पनीरचे तुकडे
२ मोठ्या आकाराचे कांदे
१ टेबलस्पून तेल
कमी वयात केस पांढरे आणि पातळ झाले? बघा उपाय- केसांच्या सगळ्याच तक्रारी संपून जातील
१ मध्यम आकाराची सिमला मिरची
३ ते ४ हिरव्या मिरच्या
५ ते ६ लसूण पाकळ्या आणि आल्याचा छोटासा तुकडा
२ ते ३ चमचे दही
१ टीस्पून मीरेपूड आणि दालचिनी पावडर
चवीनुसार मीठ आणि लाल तिखट
४ ते ५ टेबलस्पून कोथिंबीर
कृती
पनीर हराभरा करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. यानंतर कांद्याचे आणि सिमला मिरचीचे मोठे काप करून घ्या.
कढईमध्ये तेल गरम कराला ठेवा. तेल गरम झाले की त्यामध्ये कांद्याचे काप, सिमला मिरची, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं घालून सगळं परतून घ्या.
पिंपल्स वाढल्याने चेहरा खराब दिसतो? फक्त ५ गोष्टी सांभाळा, काही दिवसांतच पिंपल्स गायब
परतून घेतलेले पदार्थ थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला. त्यात कोथिंबीर घाला आणि बारीक वाटण करून घ्या. यानंतर पुन्हा गॅसवर कढई गरम करायला ठेवा. तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात हिरवं वाटण घाला. ते चांगलं परतून घ्या. त्याला तेल सुटलं की त्यामध्ये पनीर घाला. चवीनुसार मीठ आणि तिखट घाला आणि झाकण ठेवून वाफ येऊ द्या. चमचमीत अशी हरभरा पनीर भाजी तयार.
