Lokmat Sakhi >Food > Deep Amavasya 2025 : दिव्याच्या आवसेला करा बाजरीचे गोड दिवे, पारंपरिक पदार्थ - खा पोटभर!

Deep Amavasya 2025 : दिव्याच्या आवसेला करा बाजरीचे गोड दिवे, पारंपरिक पदार्थ - खा पोटभर!

Deep Amavasya 2025: Celebrate the festival in traditional way, traditional dish : पीठाचे दिवे करायला एकदम सोपे. एकदा बाजरीचेही करुन पाहा. चव छान आणि पारंपरिक रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2025 15:30 IST2025-07-22T15:27:30+5:302025-07-22T15:30:30+5:30

Deep Amavasya 2025: Celebrate the festival in traditional way, traditional dish : पीठाचे दिवे करायला एकदम सोपे. एकदा बाजरीचेही करुन पाहा. चव छान आणि पारंपरिक रेसिपी.

Deep Amavasya 2025: Celebrate the festival in traditional way, traditional dish | Deep Amavasya 2025 : दिव्याच्या आवसेला करा बाजरीचे गोड दिवे, पारंपरिक पदार्थ - खा पोटभर!

Deep Amavasya 2025 : दिव्याच्या आवसेला करा बाजरीचे गोड दिवे, पारंपरिक पदार्थ - खा पोटभर!

आषाढ अमावस्येला दिप अमावस्या असेही म्हटले जाते. या दिवशी खाद्या पदार्थांचे दिवे केले जातात. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे लोक विविध प्रकारची पुजा करतात. (Deep Amavasya 2025: Celebrate the festival in traditional way, traditional dish)गावोगावीची पद्धत वेगळी. तसेच दिवे तयार करतानाही वेगळ्या पीठांचे केले जातात. त्यापैकीच एक प्रकार म्हणजे बाजरीचे दिवे. करायला एकदम सोपा प्रकार आहे. बाजरीचे पीठ फार पौष्टिक असते. हे दिवे करायला एकदम सोपे आहेत. बाजरीचे छान ताजे पीठ वापरले की अजिबात तुटत नाहीत. वाफवताना जरा काळजी घेतली म्हणजे मस्त दिवे करता येतात. 

साहित्य 
बाजरी, गूळ, जायफळ पूड, तूप, दूध, पाणी 

कृती
१. गूळ किसून घ्यायचा. वाटीभर बाजरीचे पीठ घेत असाल तर त्यासोबत वाटीभर गुळही घ्यायचा. हे दिवे गोडच छान लागतात. त्यामुळे गूळ बेताचा नको भरपूर घाला. जेवढे दिवे हवे त्यानुसार प्रमाण ठरवा. गूळ किसून झाल्यावर त्यात थोडे दूध घालायचे. पाणी ही काही जण घालतात. तुम्हाला जे आवडेल ते वापरा. दुधाची चव जरा जास्त छान लागते. गूळ दुधात विरघळवायचा. त्यासाठी तो सतत ढवळायचा. दूध आणि गूळ छान एकजीव करुन घ्यायचे. त्यात थोडी जायफळ पूड घालायची. गूळ आणि जायफळ एकत्र केल्यावर चवीला फार मस्त लागते.  

२. बाजरीचे पीठ चाळून घ्यायचे. छान ताजे पीठ वापरा. जुन्या पीठाचे दिवे होतात. मात्र त्यांना चिरा पडतात. त्यामुळे ताजे दळलेले पीठ वापरा. बाजरीच्या पीठात दूध आणि गुळाचे मिश्रण घालायचे. छान मिक्स करायचे. नंतर गरजे नुसार दूध घालून पीठ मळायचे. मऊसर असे पीठ मळा. मात्र जास्त सैल नको. त्याला आकार देता येईल असे पीठ मळायचे. 

३. पीठ मळून झाल्यावर त्याला दिव्यांचा आकार द्यायचा. मध्यम आकाराचे दिवे करा. म्हणजे जास्त लहान होत नाहीत.  जास्त मोठे झाले की ते तुटतात. इडलीपात्रात किंवा मोदक पात्रात पाणी गरम करत ठेवायचे. पाणी गरम झाल्यावर त्यात दिवे लावायचे आणि वाफवून घ्यायचे. दोन्ही पात्र घरी नसतील तर मग एका कढईत पाणी गरम करा. त्यावर अर्ध्यात अडकेल अशी ताटली ठेवा. त्यावर दिवे मांडा आणि झाकून एक वाफ काढून घ्या. दोन ते पाच मिनिटांत दिवे काढून घ्यायचे. त्यात तूप भरायचे. हे दिवे भरपूर तुपासोबत छान लागतात.      

Web Title: Deep Amavasya 2025: Celebrate the festival in traditional way, traditional dish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.