स्वयंपाक करणं आणि नवनवीन पदार्थ घरी करून पाहणं हा एक छान अनुभव आहे, परंतु जेवणानंतर दिसणारा भांड्यांचा ढीग मोठा त्रासदायक ठरू शकतो. अनेकांना आवडत नसलेलं काम म्हणजे भांडी घासणे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ,भांडी घासताना तुम्ही नकळत अनेक चुका करू शकता, ज्याचा तुमच्या आरोग्यावर आणि स्वयंपाकघरातील स्वच्छतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. बरेच लोक फक्त भांडी चमकवण्यावर लक्ष केंद्रित करतात, परंतु जर स्वच्छता योग्यरित्या केली गेली नाही तर बॅक्टेरिया, ग्रीस आणि केमिकल्स तुमच्या भांड्यांवर राहू शकतात, ज्यामुळे नंतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. कोणत्या चुका टाळायच्या हे जाणून घेऊया...
घाणेरडा स्पंज किंवा स्क्रबर वापरणं
जर तुम्ही तेच स्क्रबर किंवा स्पंज महिनोनमहिने वापरत असाल तर ते बॅक्टेरिया आणि फंगसचं घर बनू शकतं. यामुळे तुमची भांडी आणि हात यांना इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून, दर आठवड्याला स्क्रबर गरम पाण्यात बुडवून स्वच्छ करा आणि वेळोवेळी ते बदलात राहा.
थंड पाण्याने भांडी धुणं
तुम्हीही थंड पाण्याने भांडी धुता का? जर उत्तर हो असेल तर तेल आणि ग्रीस यामुळे व्यवस्थित काढलं जाणार नाहीत आणि बॅक्टेरिया भांड्यांवर राहू शकतात. भांडी पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणी वापरणं योग्य आहे.
जास्त प्रमाणात डिशवॉशिंग लिक्विड वापरणं
बहुतेक लोकांना असं वाटतं की जास्त डिशवॉशिंग लिक्विड लावल्याने भांडी स्वच्छ होतील, परंतु तसं नाही. साबणाचे अवशेष भांड्यांवर राहू शकतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. योग्य प्रमाणात डिटर्जंट लावा आणि भांडी पूर्णपणे धुवा.
ओली भांडी एकत्र ठेवणं
धुतलेली भांडी नीट वाळवली नाहीत तर त्यामध्ये बॅक्टेरिया आणि फंगस वाढू शकतात. ओली भांडी एकमेकांवर ठेवण्यापूर्वी किंवा स्टँडमध्ये व्यवस्थित ठेवण्यापूर्वी नेहमी पुसून स्वच्छ करा.
लाकडी भांडी जास्त वेळ पाण्यात ठेवणं
चमचे, कटिंग बोर्ड, पोलपाट-लाटणे आणि सर्व्हिंग स्पून यांसारखी लाकडी भांडी सुंदर दिसतात आणि वापरण्यास सोपी असतात, पण तुम्हाला माहित आहे का की जर ती जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवली तर ती खराब होऊ शकतात. पाण्याच्या सतत संपर्कात राहिल्याने लाकडाला लहान भेगा पडू शकतात, जिथे बॅक्टेरिया आणि फंगस वाढू लागतात.
सिंक आणि ड्रेन साफ न करणं
भांडी धुतल्यानंतर आपलं स्वयंपाकघर स्वच्छ आहे असं समजून आपल्याला अनेकदा चांगलं वाटतं. पण तुम्ही सिंक आणि ड्रेन स्वच्छ करण्याकडे लक्ष दिलं का? जर तुम्ही सिंक आणि ड्रेन नियमितपणे स्वच्छ केलं नाही तर ते तुमच्या स्वयंपाकघरासाठी ते मोठं संकट ठरू शकतं. सिंक आणि ड्रेनमध्ये साचलेली घाण बॅक्टेरिया, फंगस आतुमच्या भांड्यांमधून तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात.