Join us

साऊथ इंडियन डाळ वडा बनवण्याची पारंपरिक रेसिपी, पौष्टिक आणि चमचमीत खाण्याचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2023 18:08 IST

Dal Vada Recipe - South Indian Snack साऊथ इंडियन पदार्थ आवडतात? घरीच बनवा डाळ वडा, काही मिनिटात डिश रेडी..

दक्षिण भारतीय पदार्थ आपल्या प्रत्येकाच्या आवडीचे आहेत. इडली, डोसा, मेदू वडा, डाळ वडा हे पदार्थ लोकं चवीने खातात. नाश्तासाठी हे पदार्थ बेस्ट ऑप्शन मानले जातात. अनेकांना डाळ वडा हा पदार्थ प्रचंड आवडतो. डाळ वडा हा पदार्थ विविध डाळीचा वापर करून तयार होतो. हा पदार्थ फक्त चवीसाठी उत्कृष्ट नसून, डाळीतील बरेच पौष्टीक घटक शरीराला मिळतात. त्यामुळे डाळ वडा हा प्रोटीन व इतर पौष्टीक घटकने परिपूर्ण आहे.

दिवसभरात जेव्हाही भूक लागते, तेव्हा आपण डाळ वडा बनवू शकता. लहानग्यांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत हा पदार्थ प्रत्येकाला आवडेल. डाळ वडा बनवणे खूप सोपे आहे. डाळी भिजवून, जाडसर बारीक करून बनवली जाते. चला तर मग या कुरकुरीत पदार्थाची कृती पाहूयात(Dal Vada Recipe - South Indian Snack).

डाळ वडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य

१ कप चणा डाळ 

लाल - हिरवी मिरची 

जिरं 

बडीशेप 

बारीक चिरलेला कांदा 

बारीक चिरलेला कडीपत्ता

मिरचीचं लोणचं करण्याची पारंपरिक रेसिपी, भूक खवळेल असं चमचमीत लोणचं, पाहा रेसिपी

आलं - लसूण पेस्ट 

मीठ 

तेल

कृती

सर्वप्रथम, एका भांड्यात एक कप चणा डाळ घ्या. त्यात पाणी घालून रात्रभर किंवा ८ तासांसाठी भिजत ठेवा. डाळी भिजल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या. व ही डाळ मिक्सरच्या भांड्यात घाला, व त्यात लाल - हिरवी मिरची, जिरं, बडीशेप घालून मिश्रण जाडसर वाटून घ्या.

पीठ -मीठ -पाणी आणि ५ मिनिटात करा जाळीदार घावन, मऊ लुसलुशीत घावनांची मजाच न्यारी..

मिश्रण वाटून झाल्यानंतर त्यात एक कप भिजलेली चणा डाळ, बारीक चिरलेला कडीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, आलं - लसूण पेस्ट, मीठ घालून मिश्रण हाताने मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्याला छोटे - छोटे वड्यांचा आकार द्या.

दुसरीकडे कढईत तेल गरम करत ठेवा, या तेलात हे तयार डाळीचे वडे तळून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत डाळ वडा खाण्यासाठी रेडी. आपण हा डाळ वडा चटणी अथवा जेवणासोबत खाऊ शकता.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स