चटणी, कोशिंबीर, लाेणचं हे पदार्थ जेवणात तोंडी लावायला असतातच. कधी कधी त्यात बदल आणि झणझणीतपणा यावा म्हणून मिरचीचा ठेचाही आपण करतो. पण काही जणांना मिरचीचा ठेचा खूप तिखट वाटतो. त्याला पर्याय म्हणून मिरचीचा एखादा खमंग आणि झणझणीत पदार्थ हवा असेल तर दही बेसन मिरची हा पदार्थ चाखून पाहा. हा पदार्थ करायला खूप सोपा आहे आणि अगदी झटपट होणारा आहे (how to make dahi mirchi?). त्यामुळे कधी तरी जेवणात तोंडी लावायला दही मिरची करून पाहाच..(dahi mirchi recipe)
दही मिरची करण्याची रेसिपी
७ ते ८ हिरव्या मिरच्या
१ टेबलस्पून तेल
फोडणीसाठी हिंग, मोहरी, जिरे, चिमूटभर हळद
पाणी गरम करण्याच्या हीटिंग रॉडवर पांढरा- पिवळट थर जमला? घ्या उपाय, ५ मिनिटांत रॉड स्वच्छ
१ चमचा बेसन
चवीनुसार मीठ
२ चमचे दही
कृती
सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर तिच्यामध्ये तेल घाला आणि फोडणी करून घ्या.
यानंतर कढईमध्ये मिरच्या घाला आणि चांगल्या परतून घ्या. मिरच्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये बेसन घाला आणि मंद आचेवर मिरच्या, बेसन परतून घ्या.
मिरच्या आणि बेसन परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं दही आणि चवीनुसार मीठ घाला. आता कढईवर झाकण ठेवून थोडी वाफ येऊ द्या आणि त्यानंतर गॅस बंद करून टाका. गरमागरम दही मिरची तयार..
