Join us

पालकाची भाजी नको म्हणणाऱ्यांसाठी खास पदार्थ ‘पालक स्टिक्स!’ पालकाचं पोेषण आणि चमचमीत पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2024 16:15 IST

Crunchy Palak Sticks Recipe : करायला अतिशय सोप्या आणि चविष्ट अशा या वड्या करण्याची सोपी रेसिपी...

पालकामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे कॅल्शियम, सोडियाम, कलोरीन, फॉस्फरस, लोह, खनिज प्रोटीन, आयर्न, विटामीन सी, विटामीन ए भरपूर प्रमाणामध्ये आढळते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आहारात पालक असायला हवा असे म्हटले जाते. पालक म्हटला की आपण त्याची पातळ ताकातली भाजी, पालक पनीर, पालक राईस किंवा पालक पुऱ्या असे काही ना काही करतो. पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो. तसेच लहान मुले पालेभाजी असली की नाक मुरडतात. पण ही पालेभाजी त्यांच्या पोटात जावी आणि ते त्यांच्या लक्षातही येऊ नये यासाठी आज आपण पालकापासून तयार होणारा एक अतिशय चविष्ट असा पदार्थ पाहणार आहोत. पालक स्टीक्स असे या पदार्थाचे नाव आहे. करायला अतिशय सोप्या आणि चविष्ट अशा या वड्या कशा करायच्या पाहूया (Crunchy Palak Sticks Recipe)...

१. हरभरा डाळ ५ ते ६ तासांसाठी भिजत घालायची. 

२. मिक्सरच्या भांड्यात ओवा, धणे, जीरे, मिरच्या, लसूण आणि हरभरा डाळ बारीक करुन घ्यायची.

(Image : Google)

३. या मिश्रणात धुवून बारीक चिरलेला पालक, कोथिंबीर, तीळ, हळद, हिंग आणि मीठ घालायचे. 

४. हे पीठ चांगले एकजीव करुन इडली पात्रामध्ये हे पीठ घालून इडल्या करतो त्याप्रमाणे शिजवून घ्यायचे.

५. साधारण १० मिनीटे वाफवल्यावर याच्या सुरीने बारीक स्टीक करायच्या आणि त्या तेलात कुरकुरीत तळून घ्यायच्या.

६. या स्टीक अतिशय चविष्ट लागत असून लहान मुलांच्या पोटात पालक जाण्यासाठी हा सोपा आणि अतिशय छान पर्याय ठरु शकतो. 

७. या स्टीक आपण दही, चटणी, सॉस कशासोबतही खाऊ शकतो.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.