Join us

पालक चिरून नाहीतर अख्ख्या पानांची करा कुरकुरीत भजी, कमी तेल पिणारी भजी, खवय्यांना नक्की आवडेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2023 14:03 IST

Crispy Palak Pakoda Recipe (Step by Step + Video) पालकाची भाजी नाही तर, करा पालकाची क्रिस्पी हॉटेलस्टाईल भजी, चव अशी की न खाणारेही चवीने खातील..

आहारात हिरव्या पाले भाज्यांचा समावेश असणं गरजेचं आहे. मेथी, कांदा पात, शेपू, पालक, या भाज्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पालक चवीला उत्कृष्ट तर लागतेच, पण त्यातील पौष्टीक गुणधर्म जसे की, मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम, कॅल्शियम हे घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

पालकाचे अनेक पदार्थ केले जातात. पालक पनीर, पालकाची भाजी, पालक पराठे, पण आपण कधी पालकाच्या पानांची भजी ट्राय करून पाहिली आहे का?  भजी या पदार्थाचा खवय्यावर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे पालक न खाणारेही पालकाच्या पानांची भजी चवीने खातील. चला तर मग या कुरकुरीत पदार्थाची कृती पाहूयात(Crispy Palak Pakoda Recipe).

पालकाच्या पानांची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य

पालक

बेसन

तेल

पाणी

पालकाची भाजी आवडत नसली तरी पालकाची कुरकुरीत वडी नक्की आवडेल, पालक वडीची सोपी रेसिपी

लाल तिखट

मीठ

हळद

कृती

सर्वप्रथम, पालकाची छोटी पाने निवडून स्वच्छ धुवून घ्या. पालक भजीसाठी शक्यतो छोट्या पानांचा वापर करा. एका वाटीत बेसन घ्या, त्यात चिमुटभर हळद, २ चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ व पाणी घालून मिश्रण मिक्स करा. बेसनाचे मिश्रण जास्त पातळ किंवा घट्ट नसावे.

भजी फार तेलकट होतात? ४ उपाय - भजी तेल पिणार नाहीत - होतील खमंग

दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल घाला. आता पालकाची अख्खी पाने बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून गरम तेलात सोडा. गॅस हाय फ्लेमवर ठेवा. जेणेकरून भजी कुरकुरीत होतील. यासह भजी जास्त तेलही शोषून घेणार नाहीत. भजी तळून झाल्यानंतर एका प्लेटवर टिश्यू पेपर ठेवा व त्यावर तयार भजी काढून ठेवा. यामुळे भजीतील अतिरिक्त तेल टिश्यू पेपर शोषून घेईल. अशा प्रकारे कुरकुरीत पालक भजी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स