Which Milk is Good Cow or Buffalo: दूध हे शरीरासाठी संपूर्ण आणि पौष्टिक आहार मानलं जातं. यात प्रथिने, कॅल्शियम, व्हिटामिन D, व्हिटामिन B12 आणि फॉस्फरस यांसारखे अनेक आवश्यक पोषक तत्व असतात. नियमित दूध प्यायल्याने हाडं, दात, स्नायू आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. साधारणपणे लोक गाय आणि म्हैस या दोघींचं दूध पिणं पसंत करतात. दोन्हीही प्रकारचं दूध फायद्याचं असतं, पण पोषकतेच्या दृष्टीने त्यात थोडा फरक आहे. याबाबत आचार्य मनीषजी यांनी सांगितलं आहे की, म्हशीचं दूध का टाळावं आणि सर्वात चांगलं दूध कोणतं असतं.
म्हशीचं दूध
आचार्य मनीष यांच्या मते, म्हशीचं दूध जड आणि घट्ट असतं, त्यामुळे ते उशीरा पचतं. म्हशीच्या शरीरात ग्रोथ हार्मोन जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे त्याचं दूध नियमित पिणाऱ्या लोकांमध्ये ट्युमर, गाठी आणि स्टोन होण्याचा धोका अधिक वाढतो. पूर्वीच्या काळात जे लोक खूप शारीरिक मेहनत करायचे, जसं की शेतमजूर किंवा पशुपालक तेवढेच लोक म्हशीचं दूध पित असत, कारण त्यांना तेवढी उष्णता आणि ऊर्जा लागायची.
गायीचं दूध
आरोग्याच्या दृष्टीने गायीचं दूध अधिक लाभदायक मानलं जातं. यात फॅट कमी प्रमाणात असते आणि हे पचायला हलकं असतं. गायीच्या दुधातील प्रथिने शरीर मजबूत करतात आणि तुटलेल्या टिश्यूज पुन्हा दुरुस्त करण्यास मदत करतात. तसंच, यात असलेलं कॅल्शियम आणि व्हिटामिन D मुलं आणि वृद्ध दोघांच्या हाडं व दात मजबूत ठेवतात.
म्हशीचं दूध कधी उपयोगी ठरतं?
म्हशीचं दूध वजन वाढवण्यासाठी उत्तम असतं, कारण त्यात फॅट जास्त असतं. तसंच हे दूध पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं चांगलं स्रोत मानलं जातं, ज्यामुळे शरीरातील स्नायूंना आणि नर्व्ह सिस्टीमला फायदा होतो.
कुणी दूध टाळावं?
सगळ्यांसाठी दूध पिणं फायदेशीर असतंच असं नाही. जर तुम्हाला फॅटी लिव्हर, पीसीओएस (PCOS) किंवा पचनाशी संबंधित समस्या असतील, तर दूध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
