Lokmat Sakhi >Food > दूध गरम होताना उजव्या बाजुने ढवळावं की डाव्या बाजुने? वाचा चरक संहितामधली रंजक माहिती 

दूध गरम होताना उजव्या बाजुने ढवळावं की डाव्या बाजुने? वाचा चरक संहितामधली रंजक माहिती 

Correct Method of Stirring Milk According to Charak Sanhita: दूध पित असाल किंवा घरातल्या कोणत्याही सदस्यांना दूध प्यायला देत असाल तर चरक संहितामधली ही माहिती एकदा वाचाच...(benefits of stirring milk in clockwise or anticlockwise direction)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2025 15:22 IST2025-08-25T15:21:07+5:302025-08-25T15:22:07+5:30

Correct Method of Stirring Milk According to Charak Sanhita: दूध पित असाल किंवा घरातल्या कोणत्याही सदस्यांना दूध प्यायला देत असाल तर चरक संहितामधली ही माहिती एकदा वाचाच...(benefits of stirring milk in clockwise or anticlockwise direction)

correct method of stirring milk according to charak Sanhita, benefits of stirring milk in clockwise or anticlockwise direction | दूध गरम होताना उजव्या बाजुने ढवळावं की डाव्या बाजुने? वाचा चरक संहितामधली रंजक माहिती 

दूध गरम होताना उजव्या बाजुने ढवळावं की डाव्या बाजुने? वाचा चरक संहितामधली रंजक माहिती 

Highlights दूध तापवताना त्यातून पळी गोलाकार फिरवल्यास त्याचे गुणधर्म प्रत्येकवेळी बदलत जातात.

दूध आणणे आणि ते गरम करणे, उकळवणे ही अगदी दररोज प्रत्येक घरामध्ये होणारी एक अगदी सामान्य बाब. आता दूध गरम होत असताना किंवा उकळत असताना ते पळीने ढवळून घेतलं किंवा नाही घेतलं तरी काय फरक पडणार किंवा मग ते डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे म्हणजेच क्लॉकवाईज किंवा ॲण्टी क्लॉकवाईज दिशेने फिरवल्यास असं त्यात काय वेगळं होणार असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर चरक संहिता या विस्तृत ग्रंथात दिलेली माहिती वाचायलाच हवी (Correct Method of Stirring Milk According to Charak Sanhita).. दूध क्लॉकवाईज फिरवल्याने काय होतं आणि ॲण्टी क्लॉकवाईज दिशेने फिरवल्यास काय होतं, आपल्या तब्येतीला त्यापैकी कोणतं जास्त मानवणारं आहे, हे पाहा...(benefits of stirring milk in clockwise or anticlockwise direction)

 

दूध गरम होत असताना ते क्लॉकवाईज दिशेने फिरवावं की ॲण्टीक्लॉकवाईज?

दूध गरम होत असताना ते नेमकं कोणत्या दिशेने ढवळून घेतलं पाहिजे याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ nabhisutra and mygrannysays या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं सांगितलं आहे की दूध तापवताना त्यातून पळी गोलाकार फिरवल्यास त्याचे गुणधर्म प्रत्येकवेळी बदलत जातात.

हरितालिकेच्या उपवासासाठी करा टम्म फुगून हलके झालेले खमंग इंस्टंट अप्पे- पचायलाही सोपे

जर तुम्ही उजव्या बाजुने म्हणजेच clockwise पद्धतीने दूध ढवळलं तर त्याचा घट्टपणा वाढतो. वजन वाढण्यासाठी ते मदत करतं. त्यामुळे लहान मुलांना, बाळंतिणीला किंवा आजारातून उठलेल्या अशक्त व्यक्तीला असं दूध देणं फायदेशीर ठरतं.

 

जर गरम होणारं दूध डाव्याबाजुने म्हणजेच Anticlockwise दिशेने फिरवलं तर ते पचायला हलकं होत जातं. असं दूध प्यायल्यास कफ दोष वाढत नाही. जे लोक संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापुर्वी दूध घेतात त्यांनी शक्यतो या पद्धतीचं दूध घ्यावं.

डायबिटीस: कारल्याचा, भोपळ्याचा ज्यूस पिऊन कंटाळलात? ५ चवदार भाज्या खा, शुगर राहील कंट्रोलमध्ये..

मॉडर्न सायन्सनुसारही असं सांगण्यात आलं आहे की दूध तापवताना ते कोणत्यातरी एकाच दिशेने फिरवावं. जेणेकरून त्याच्यातल्या प्रोटीन्सचा आणि पौष्टिक घटकांचा पुरेपूर लाभ शरीराला होतो. केशर, जायफळ घालून दूध उकळवत असाल तर ते उजव्या बाजुने ढवळा. यामुळे मन शांत होऊन चांगली झोप येते. तर दालचिनी, आलं घालून दूध गरम करताना ते डाव्याबाजुने ढवळावं. यामुळे पचनक्रिया चांगली होते.  


 

Web Title: correct method of stirring milk according to charak Sanhita, benefits of stirring milk in clockwise or anticlockwise direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.