Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > चुकीच्या पद्धतीने मखाने खाल्ले तर फायदे मिळणारच नाहीत, पाहा मखाने खाण्याची योग्य पद्धत

चुकीच्या पद्धतीने मखाने खाल्ले तर फायदे मिळणारच नाहीत, पाहा मखाने खाण्याची योग्य पद्धत

Correct Method of Eating Makhana: मखाने नक्की खा, पण ते योग्य पद्धतीने खाल्ले तरच शरीरासाठी लाभदायक ठरणार आहेत...(how to eat makhana properly?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2026 13:08 IST2026-04-03T13:07:19+5:302026-04-03T13:08:39+5:30

Correct Method of Eating Makhana: मखाने नक्की खा, पण ते योग्य पद्धतीने खाल्ले तरच शरीरासाठी लाभदायक ठरणार आहेत...(how to eat makhana properly?)

correct method of eating makhana, how to eat makhana properly, benefits of eating makhana  | चुकीच्या पद्धतीने मखाने खाल्ले तर फायदे मिळणारच नाहीत, पाहा मखाने खाण्याची योग्य पद्धत

चुकीच्या पद्धतीने मखाने खाल्ले तर फायदे मिळणारच नाहीत, पाहा मखाने खाण्याची योग्य पद्धत

Highlightsमखाना खाण्याचे सगळे फायदे तेव्हाच मिळू शकतात, जेव्हा मखाना योग्य पद्धतीने खाल्ले जातात

मखाने हा मागच्या काही वर्षांपासून अतिशय लोकप्रिय झालेला पदार्थ. पुर्वी या पदार्थाला फार मागणी नव्हती. कारण त्याचे महत्त्वच लोकांना माहिती नव्हते. पण आता मात्र मखाने महाग असले तरी बहुतांश घरात दिसतात. कारण मखान्यांमध्ये फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम असे कित्येक पौष्टिक घटक असतात. कॅलरी कमी आणि प्रोटीन्स जास्त अशा पद्धतीचा हा पदार्थ असल्याने वजन कमी करणाऱ्यांसाठीही तो खूप उपयुक्त ठरतो. शिवाय मखान्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठीही मखाना खाणे फायदेशीर ठरते. पण मखाना खाण्याचे हे सगळे फायदे तेव्हाच मिळू शकतात, जेव्हा मखाना योग्य पद्धतीने खाल्ले जातात (Correct Method of Eating Makhana). म्हणूनच मखाना खाण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती ते पाहुया...(how to eat makhana properly?)

मखाना खाण्याची योग्य पद्धत कोणती?

 

डॉक्टर असं सांगतात की आयुर्वेदानुसार मखाना हे उष्ण मानले जातात. जेव्हा तुम्ही मखाना नुसतेच खाता तेव्हा ते शरीरातला वायु वाढवतात. आणि त्याचा शरीराला पाहिजे तसा लाभ होत नाही.

व्यायाम, डाएट करूनही वजन कमी का होत नाही? पाहा ३ कारणं- बघा काय करायचे उपाय

त्यातले पौष्टिक घटक शरीराला पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे मखाना कधीही जसेच्या तसे खाऊ नका. मखाना खाण्याच्या आधी ते नेहमी कढईमध्ये तूप घालून त्यात हलकेसे परतून घ्या. त्यानंतर त्याला थोडंसं मीठ लावून मग खा.

 

कारण यामुळे मखाने पचायला सोपे जातात. शरीरात वायु निर्माण होत नाही आणि त्यातल्या पौष्टिक घटकांचा पुरेपूर लाभ शरीराला मिळतो.

८ दिवसांत खुलेल त्वचेचं सौंदर्य- तुरटी, गुलाबपाणी घेऊन करा 'हे' उपाय- स्वत:ला पाहातच बसाल...

त्यामुळे खीर करायची असेल किंवा एखाद्या लाडूमध्ये घालायचे असतील किंवा इतर कोणत्याही स्वरुपात मखाने खायचे असतील तरी आधी ते तूप लावून थोडेसे परतून घ्या. ते चांगले फुलून येऊन कुरकुरीत होऊ द्या आणि त्यानंतरच ते खा.


 

Web Title : अधिकतम स्वास्थ्य लाभ के लिए मखाना को सही तरीके से खाएं!

Web Summary : मखाना पोषक तत्वों से भरपूर होता है, जो वजन घटाने और मधुमेह के लिए फायदेमंद है। आयुर्वेद के अनुसार मखाना को घी में भूनकर खाना चाहिए। यह पाचन में मदद करता है, गैस को रोकता है और पोषक तत्वों के अवशोषण को बढ़ाता है। सर्वोत्तम स्वास्थ्य लाभ के लिए इसे घी के साथ भूनने के बाद ही विभिन्न रूपों में लें।

Web Title : Eat makhana the right way for maximum health benefits!

Web Summary : Makhana, rich in nutrients, is beneficial for weight loss and diabetes. Ayurveda suggests roasting makhana in ghee before consumption. This aids digestion, prevents gas, and enhances nutrient absorption. Enjoy it in various forms, always after roasting with ghee for optimal health benefits.