Join us
Daily Top 2Weekly Top 5

मक्याची कुरकुरीत भजी अन् पॅटिस पावसाळ्यात नक्की ट्राय करा; खाणारेही म्हणतील वाह, क्या बात है...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 14:52 IST

Corn recipes : जास्तीचे मके विकत घेऊन तुम्ही रोज त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता तेवढाच चवीत बदल सुद्धा होतो आणि नवीन काहीतरी खाण्याचा आनंद घेता येतो.

ठळक मुद्देअनेकांची तक्रार असते की मक्याचे कणीस खाताना दातात प्रचंड अडकतात. त्यासाठीच आम्ही तुम्हाला इतर काही ऑप्शन्स सांगणार आहोत. या पावसाळ्यात तुम्ही हेल्दी आणि हटके मक्याची भजी, पॅटीस खाऊन तुम्ही आनंद मिळवू शकता. मक्याचा कणीस उकळून किंवा भाजून खाण्यापेक्षा तुम्ही कधीतरी अशा रेसिपीज ट्राय केल्या तर घरची मंडळी  तुफान खूश होतील.

पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र मक्याचे कणीस दिसायला सुरूवात होते. पिवळे, फ्रेश मक्याचे कणीस पाहिले तर खाण्याचा मोह आवरला जात नाही.  इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्याच्या वातावरण मके स्वस्तात मिळतात. त्यामुळे जास्तीचे मके विकत घेऊन तुम्ही रोज त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता तेवढाच चवीत बदल सुद्धा होतो आणि नवीन काहीतरी खाण्याचा आनंद घेता येतो. लिंबू, मीठ लावून मक्याचा कणीस खायला कोणाला नाही आवडत? पण अनेकांची तक्रार असते की मक्याचे कणीस खाताना दातात प्रचंड अडकतात. त्यासाठीच आम्ही तुम्हाला इतर काही ऑप्शन्स सांगणार आहोत. 

या पावसाळ्यात तुम्ही हेल्दी आणि हटके मक्याची भजी, पॅटीस खाऊन तुम्ही आनंद मिळवू शकता. मक्याचा कणीस उकळून किंवा भाजून खाण्यापेक्षा तुम्ही कधीतरी अशा रेसिपीज ट्राय केल्या तर घरची मंडळी  तुफान खूश होतील. चला तर मग जाणून घेऊया कशी तयार करायची मक्याची कुरकुरीत भजी.

१) मक्याची भजी

साहित्य : 

मक्याचे चार वाटी उकलेल्या दाण्याची पेस्ट, 1 बटाटा उकडलेला, ब्रेडक्रम्स, थोडं तांदळाचे पीठ, हिरव्या मिरच्या, हळद, जिरं, ओवा, मीठ, तेल, पाणी

कृती : 

 मक्याच्या दाण्याची पेस्ट घेऊन त्यात कुस्करलेला बटाटा एकत्र करून घ्या.

 त्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पिठ, हिरव्या मिरच्या, हळद, मीठ, जिरं, ओवा एकत्र करून घ्यावं. 

  मिश्रण व्यवस्थित एकजीव करावं.

  तयार मिश्रणाचे छोटे चपटे गोळे करावे.

  हे गोळे ब्रेडक्रम्समध्ये घोळवून गरम तेलात तळावेत. 

  गरमा गरम मक्याची भजी खाण्यासाठी तयार आहेत. 

२) मक्याचे कबाब

साहित्य

बटाटे, तेल, मका, जायफळाची पावडर , धने, दालचिनी पावडर, बारिक चिरलेल्या मिरच्या, हिरवी मिरची , आलं-लसणाची पेस्ट , गरम मसाला पावडर, मीठ , बटर, आमचूर पावडर 

कृती : 

 बटाटा आणि मका उकडून स्मॅश करा 

 सर्व साहित्य एकत्र करून आणि त्याचे छोट्या आकाराचे गोळे तयार करून घ्या.

 प्रत्येक गोळ्यामध्ये एक टूथपिक लावा आणि तेलामध्ये डिप फ्राय करा.

 मक्याचे हेल्दी आणि टेस्टी कबाब खाण्यासाठी तयार आहेत. 

 तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता. 

 तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्सही स्टफ करू शकता. 

३) मक्याच्या कणसाचा किस

साहित्य

2 कप मक्याचे दाणे, 1 टेबलस्पून तेल, 1/2 कप दूध, 2 टेबलस्पून किसलेले ओले खोबरं, 1/2 टिस्पून जीरेे, 1/2 टिस्पून मोहरी, 1/4 टिस्पून लाल तिखट, 1/4 टिस्पून हळद, 1 चिमूटभर हिंग, 1 टिस्पून हिरवी मिरची बारीक चिरलेेेली, 1/2 टिस्पून साखर, 2 टिस्पून तेल, 1 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेेेली, 1/2 लिंबूचा रस

कृती

मक्याचा किस बनविण्यासाठी मक्याचे दाणे काढा आणि दाणे मिक्सर मध्ये फिरवून जाडसर वाटून घ्या.

एका भांड्यात गॅसच्या मध्यम आचेवर वर तेल गरम करा. त्यात राई, जीरे टाका, राई जीरे तडतडल्यावर गॅस कमी करा आणि त्याच्यात हिंग, बारीक कापलेली हिरवी मिरची घालून अर्धा मिनिट परतून घ्या.

आता यात मक्याचा जाडसर किस, लाल तिखट, हळद, मीठ आणि साखर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता ह्यात अर्धा कप दुध मिसळून परतून घ्या.

नंतर खोबऱ्याचा किस घाला. झाकण ठेऊन गॅसच्या मंद आचेवर १० ते १५ मिनिटे शिजू द्या. मधे मधे चमच्याच्या सहाय्याने परतून खालीवर करा. नंतर गॅस बंद करा. आता लिंबू पिळून लिंबू मिक्स करा. मक्याचा किस सर्व्ह करताना त्यावर ओलं खोबरं आणि कोथिंबिर घाला.

४) मक्याच्या दाण्यांचे सूप

साहित्य

1 वाटी मक्याचे दाणे, 2 टेबलस्पून आलं, मिरची व लसुण बारिक चिरलेले, 1 टीस्पून सोया सॉस, 1 टीस्पून चीली सॉस1 टीस्पून व्हीनेगर, 1/2 टीस्पून पांढरी मिरी पावङर, पातीचा कांदा, पात ऊभे चीरून, 1 सिमला मिरची बारिक कापुन घ्यावी, 1 टीस्पून मक्याचं पीठ , 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून साखर, व्हेज सिझनिंग क्यूब, तेल

कृती

मक्याचे अर्धे दाणे मीक्सरला फीरवून घ्यावे.

कढईत तेल टाकुन बारिक कापलेले आलं-लसुण-मिरची थोङं परतुन घ्यावे.

मग त्यात पातीचा पांढरा कांदा परतुन घ्यावा. सिमला मिरची परतावी. 

नंतर मक्याचे दाणे व मक्याची पेस्ट घालुन परतावे.

मग मीठ,साखर,एक टीस्पून चीली साॅस व एक टीस्पून व्हीनेगर घालावे.अर्धा टीस्पून सोया साॅस घालावा. मग क्युब घालुन ढवळून घ्यावे.

क्युबमध्ये मीठ असल्याने पहीले मीठ कमी घालावे. थोडी मिर पुड घालावी. १ टेबलस्पून काॅर्नफ्लाॅवर एक टेबलस्पून पाण्यात एकत्र करून घ्यावे. सुप ऊकळत असताना सतत ढवळत मक्याच्या पिठाची पेस्ट घालुन नीट ऊकळावे. नंतर सर्व्ह करताना हिरव्या कांदा पातीने सजवावे.

टॅग्स :अन्नपाऊसपाककृती