Join us

भाजीत मीठ घालण्याची योग्य वेळ कोणती? चुकीच्या वेळी मीठ घातलं तरी बिघडते भाजीची चव..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2025 17:34 IST

Cooking Tips: मीठ एकवेळ कमी असेल तर वरून घेता येते, पण जास्त झाले तर पदार्थ बिघडतो, यासाठी मिठाचे प्रमाण आणि टायमिंग अचूक हवे; कसे ते जाणून घ्या!

भाजी तर सगळेच करतात. अनेक पद्धतींनी करतात, कोरडी-पातळ भाज्यांचे अनेक प्रकार असतात. कुणी आता कुकरमध्येही झटपट भाज्या करते. पण कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे की भाजीत मीठ नेमके केव्हा घालावे? मीठ कधी घालतो त्यानुसारही भाजीची चव बदलू शकते.

मिठाने पदार्थ केवळ रुचकर होतो असे नाही तर शिजण्याची प्रक्रियाही जलद होते. पण मीठ नेमके कधी घालावे? मसाल्यांबरोबर, भाज्यांबरोबर की भाजी शिजून झाल्यावर? चला जाणून घेऊ. बटाटा, टोमॅटो, कांदा लवकर शिजावा म्हणून चिमूटभर मीठ घातले जाते. इतर भाज्या शिजण्याआधीच मीठ घातले तर त्या अति शिजतील आणि उशिरा घातले तर आतपर्यंत चव मुरणार नाही. पदार्थ झाल्यावर मीठ घातले तर चव मिळून येत नाही आणि चुकून जास्त झाले तर घातलेले मीठ काढता येत नाही, मग सारवा सारव करावी लागते. यासाठी मिठाचा योग्य अंदाज शिकायला हवा. 

भाज्या शिजवताना मीठ कधी घालावे?(When to add salt while cooking vegetables)

>> सुक्या भाज्यांमध्ये आधी मीठ घालणे चांगले. आधी मीठ घातल्याने भाजीला पाणी सुटते. आणि त्या खूप लवकर शिजतात. जर तुम्ही नंतर मीठ घातलं तर भाजीचं तंत्रच बिघडतं.. 

>> जर तुम्ही ग्रेव्हीच्या भाजीत खूप लवकर मीठ घातलं तर टोमॅटो किंवा कांदे लवकर शिजणार नाहीत. म्हणून, ग्रेव्ही शिजल्यानंतर ती सरबरीत करताना मीठ वापरा. ​​यामुळे भाज्या गळून जात नाहीत आणि ग्रेव्हीची चव संतुलित राहते. जर तुम्ही ते खूप लवकर घातलं तर टोमॅटो किंवा कांदे लवकर शिजणार नाहीत.

>> फोडणीत मीठ घालू नका, ते एकजीव होणार नाही आणि मिठाची खारट चव पुढे येईल. जर तुम्ही बटाटे, वाटाणे किंवा हिरव्या भाज्या उकडून घेत असाल तर तेव्हा मीठ घाला. यामुळे भाजी  चवदार होईल. 

. बरेच लोक सुरुवातीला मीठ घालतात, त्यामुळे भाजीचा रंग काळा होतो.

मीठ वापरण्याची योग्य पद्धत(Salt Tips)

>> भाज्यांमध्ये नेहमी थोडे थोडे मीठ घाला, जेणेकरून चव नियंत्रित राहील आणि सगळ्या जिन्नसांना मिठाची चव लागेल. 

>> जर नवखे असाल तर मीठ घालताना, भाजीची चव घ्यायला विसरू नका. मिठाचे प्रमाण बिघडले तर भाजी कडू  होऊ शकते. 

भाज्यांमध्ये जास्त मीठ असल्यास काय घालावे?(How to reduce much salt in curry)

>> भाज्यांमध्ये जास्त मीठ असल्यास, त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता. गॅसची आच मंद करून त्यात गरजेनुसार फेटलेले दही घाला. भाजी उकळताना दह्याचा वापर करू नका, दही फाटेल आणि भाजी  खराब दिसेल. 

>> ग्रेव्हीची भाजी करत असाल, त्यात मीठ जास्त झाले, तर क्रीम, दही, दोन चमचे भाजलेले बेसन यांचा वापर करून भाजीची चव संतुलित करता येते. 

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.