सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे बाजारात भाज्या भरपूर प्रमाणात मिळत आहेत. अशा वेगवेगळ्या भाज्या पाहिल्या की अनेक जणींना त्या घेण्याचा आणि त्यांच्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचा मोह हाेतोच. अशातच मंचुरियन हा एक सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आणि मुख्य म्हणजे त्याच्यासाठी लागणारी कोबी, सिमला मिरची आणि गाजर सध्या अगदी फ्रेश मिळत आहेत. आता तुम्हालाही या भाज्या पाहून मंचुरियन करावं वाटत असेल पण फक्त घरी केलेलं मंचुरियन हॉटेलमध्ये मिळतं तसं चमचमीत होत नाही (how to make perfect Manchurian at home?), असं तुमचं म्हणणं असेल तर पुढे सांगितलेल्या काही टिप्स लक्षात ठेवा आणि मग मंचुरियन करा (restaurant style Manchurian at home recipe). बघा एखाद्या चायनिज रेस्टॉरंटलाही लाजवेल एवढं चवदार होईल तुम्ही केलेलं मंचुरियन..(cooking tips for perfect Manchurian)
चायनिज रेस्टॉरंटसारखे परफेक्ट मंचुरियन होण्यासाठी काय करावे?
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गाजर, कोबी, सिमला मिरची या भाज्या किसल्यानंतर त्यांना पाणी सुटते. हे पाणी पुर्णपणे काढून घ्या. भाज्या हाताने दाबून त्यांच्यातलं पाणी काढा. पाणी जास्त झाल्यानेही मंचुरियन बिघडतात आणि जास्त तेलकटही होतात.
२. मंचुरियन एकदम तळायला टाकू नका. सुरुवातीला अगदी एखादाच बॉल कढईमध्ये टाकून पाहा. तो पुर्णपणे तळून घ्या. तो जर फुटला नाही किंवा थोडा सैलसर झाला नाही तरच मिश्रण परफेक्ट जमले आहे, असे समजावे आणि बाकीचे मंचुरियन तळून घ्यावे.
३. कधीही खूप जास्त मंचुरियन एकदम तळायला कढईत घालू नका. एकावेळी जास्तीतजास्त ४ ते ५ मंचुरियन तळा. ते तळत असताना गॅस मध्यम आचेवर असावा. नाहीतर मंचुरियन बाहेरून जळते आणि आतून कच्चे राहाते.
४. मंचुरियनसाठी जेव्हा सॉस तयार कराल तेव्हा गॅस नेहमी मंद आचेवर ठेवा. गॅस मोठा केला तर सॉस आणि इतर मसाले जळतात आणि मंचुरियनला करपल्याचा वास येतो.
पाकिस्तानी मंत्री मरियम औरंगजेबमधला बदल पाहातच बसले नेटिझन्स, बघा नेमकी काय झाली जादू...
५. मसाल्याचं प्रमाण अचूक जमायला हवं. एखादा मसाला किंवा सॉस जरी जास्त झाला तरी चव बिघडायला वेळ लागत नाही. यासाठीची एक सोपी आयडिया म्हणजे सगळे सॉस अगदी समप्रमाणात टाकणे. यामुळे कशाचाच खूप जास्त फ्लेवर येत नाही आणि भाज्यांचा सुगंधही टिकून राहातो.
६. तळून घेतलेले मंचुरियन झाकून ठेवू नका. नाहीतर ते मऊ पडतात. मंचुरियन तळून ठेवावे आणि सॉसही तयार करून ठेवावा. सर्व्ह करण्याच्या अगदी दोन मिनिटे आधी तळून घेतलेले मंचुरियन सॉसमध्ये टाकून गरम करून घ्यावेत आणि मग सर्व्ह करावे. जेणेकरून त्यांचं टेक्स्चर आणि चव दोन्हीही बिघडत नाही.
